सह्याद्री चौकात भरतो भाजीबाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:19 AM2021-04-25T04:19:57+5:302021-04-25T04:19:57+5:30

हा बाजार ग्रामपंचायत हद्दीत भरत असला, तरी हा परिसर एमआयडीसीच्या आवारात आहे. पोलीस प्रशासनही याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. ...

Vegetable market fills Sahyadri Chowk | सह्याद्री चौकात भरतो भाजीबाजार

सह्याद्री चौकात भरतो भाजीबाजार

हा बाजार ग्रामपंचायत हद्दीत भरत असला, तरी हा परिसर एमआयडीसीच्या आवारात आहे. पोलीस प्रशासनही याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत.

नवनागापूर ( ता.नगर ) या भागात मोठ्या प्रमाणात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आहे. एमआयडीसीमध्ये काम करणाऱ्या कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या परीसरातील नागरिक एमआयडीसी मध्ये कामाला जातात. प्रशासनाने कोरोनाची वाढती रुग्ण संख्येमुळे भाजीपाला घरपोहच विक्रीसाठी परवानगी दिली असताना भाजी विक्रेते सह्याद्री चौकात ठाण मांडून बसतात. प्रशासनाच्या आदेशाला या भाजी विक्रेत्यांनी केराची टोपली दाखविली आहे. ग्रामपंचायत ही याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. गावोगावी स्थानिक पातळीवर कोरोनासाठी कमिटी स्थापन केली असताना, हे भाजी विक्रेते भाजीबाजार भरवतात कसे. हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन असतानाही पोलीस प्रशासन दुर्लक्ष करताना दिसत आहे. पोलिसांनी एक चक्कर मारली, तरी भाजी विक्रेते बसणार नाही.

............

या भाजीविक्रेत्यांना बसण्यासाठी परवानगी दिलेली नाही. ग्रामपंचायत कर्मचारी गेले, तर त्यांना हे भाजीविक्रेते अरेरावीची भाषा वापरतात. पोलीस प्रशासनाने सहकार्य केले, तर हे भाजी विक्रेते येथे बसणार नाहीत. सकाळी दोन-तीन चक्कर पोलीस कर्मचाऱ्यांनी मारल्या पाहिजे.

- संजय मिसाळ, ग्रामविकास अधिकरी, नवनागापूर

Web Title: Vegetable market fills Sahyadri Chowk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.