पाणी चाºयाच्या शोधात निघालेल्या हरणाला वाहनाने चिरडले,टाकळी ढोकेश्वर येथील परिसरातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 01:59 PM2020-04-18T13:59:43+5:302020-04-18T14:00:03+5:30
टाकळी ढोकेश्वर : नगर -कल्याण महामार्गावरील टाकळी ढोकेश्वर(ता.पारनेर) येथील पानशेत येथे पाण्याच्या शोधात निघालेल्या हरणाला रस्ता ओलंडताना अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात ते हरण जागीच ठार झाले. ही घटना शनिवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली.

पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर परिसरात दुष्काळाची दाहकता वाढली आहे. पाण्याचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विहिरी, तलाव कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे वन्यप्राणी पाण्यासाठी लोकवस्तीवर येऊ लागली आहेत. सकाळी आठच्या सुमारास ढूस वस्तीच्या डोंगरावरून पाणी व चाºयासाठी हरीण खाली आले होते. हरीण महामार्गावरून जात असताना भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने धडक दिल्याने हरीण जाग्यावर ठार झाले. अज्ञात वाहनचालक तेथे न थांबता पसार झाला.
.............
वन्यप्राणी व पशुपक्षांसाठी पाणवठे कोण करणार?
टाकळी ढोकेश्वर,निवडुंगेवाडी,भोंद्रे परिसरात मोठमोठे हरणाचे कळप आहेत. सद्या तलाव, विहिरी कोरड्याठाक पडल्यामुळे पाण्यासाठी हरणांचे कळप लोकवस्तीपर्यंत येत आहेत. वनविभागाने किमान वन्य प्राणी व पशुपक्षी यांच्यासाठी वनविभागाच्या हद्दीत पाणवठे करून पिण्याच्या पाण्याची सोय करावी अशी मागणी प्राणीमित्र संघटना व शेतकºयांनी केली.