आईसह मुलाच्या अंगावर वाळूतस्कराने घातले वाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:17 AM2021-05-29T04:17:01+5:302021-05-29T04:17:01+5:30
शुक्रवारी(दि.२८) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास प्रतापपूर परिसरातील प्रवरा नदीपात्रातून वाळुचा उपसा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस आल्याची माहिती ...
शुक्रवारी(दि.२८) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास प्रतापपूर परिसरातील प्रवरा नदीपात्रातून वाळुचा उपसा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस आल्याची माहिती वाळूतस्करांना मिळाल्याने नदीपात्रातून बाहेर पडण्यासाठी पळापळ सुरू झाली. यामधील एका वाहन चालकाने जवळील वस्तीत वाहन नेले. तिथे घरासमोर झोपलेल्या सुनीता सुनील पवार (वय ३०), व तिचा चार वर्षांचा मुलगा दीपक पवार याच्या अंगावरून वाहन गेल्याने ते जखमी झाले.
..........
कारवाईची मागणी
आश्वी पंचक्रोशीतील वाळूतस्कंरानी प्रवरा नदीपात्रात थैमान घातले असून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू आहे. स्थानिक पुढारी व शासकीय कर्मचाऱ्यांशी संगनमताने चोरून वाळू पुरवठा करून हे वाळू तस्कर लोकांची लूट करत आहेत. प्रशासन लहान-लहान तस्करांवर कारवाई करताना दिसत असले तरी वाळू तस्करीतून पैसा, या पैशांतून राजकारण व दादागिरी करणाऱ्या मोठ्या वाळू तस्करावर कारवाई कधी होणार याकडे नागरिकाचे लक्ष लागले आहे. संगमनेरच्या महसूल प्रशासनाने प्रवरा नदीपात्रालगत असलेल्या या गावांमध्ये गस्त वाढवून वाळू तस्करांवर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकातून जोर धरू लागली आहे.