‘व्यंकटेश’चा महिलांना स्वावलंबी बनविण्याचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:19 AM2021-01-04T04:19:17+5:302021-01-04T04:19:17+5:30

बोधेगाव : सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून व्यंकटेश फाऊंडेशनकडून महिलांना सक्षम व स्वावलंबी बनविण्यासाठी एका अभिनव उपक्रमाचा प्रारंभ करण्यात ...

Venkatesh's initiative to make women self-reliant | ‘व्यंकटेश’चा महिलांना स्वावलंबी बनविण्याचा उपक्रम

‘व्यंकटेश’चा महिलांना स्वावलंबी बनविण्याचा उपक्रम

बोधेगाव : सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून व्यंकटेश फाऊंडेशनकडून महिलांना सक्षम व स्वावलंबी बनविण्यासाठी एका अभिनव उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.

फाऊडेशनने अहमदनगर येथे व्यंकटेश स्किल डेव्हलपमेंट संस्थेची स्थापना करून त्या अंतर्गत ब्लाऊज शिलाई कोर्सची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

व्यंकटेश फाऊंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. याच पार्श्वभूमीवर अहमदनगर शहरातील महिलांना रोजगाराची संधी मिळावी, स्वतःचा उद्योग करून कुटुंबाचा गाडा यशस्वीपणे हाकता यावा, या उद्देशाने व्यंकटेश फाऊंडेशनने अत्यल्प दरात महिलांसाठी ब्लाऊज शिलाई प्रशिक्षण सुरू केले आहे. व्यंकटेश उद्योग समूहाचे अध्यक्ष अभिनाथ शिंदे म्हणाले, महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी व्यंकटेश परिवार सतत प्रयत्नशील असतो. स्कूल डेव्हल्पमेंट संस्थेअंतर्गत रंगीन ब्लाऊज झोनमार्फत महिलांना प्रशिक्षण देऊन आवश्यक अर्थसहाय्यही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. महिलांनी अधिक माहितीसाठी प्रोफेसर कॉलनी, सावेडी, अहमदनगर येथे संपर्क साधावा, असे आवाहन फाऊंडेशनचे सहकारी संचालक ज्ञानेश झांबरे यांनी केले आहे.

Web Title: Venkatesh's initiative to make women self-reliant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.