टाकाऊ वस्तूपासून अभियांत्रिकी विद्यार्थी सोहेल सय्यद याने तयार केले व्हेंटिलेटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2020 01:46 PM2020-04-30T13:46:13+5:302020-04-30T13:46:21+5:30
जामखेड - सध्या व्हेंटिलेटरची आवश्यकता पाहता कोरोनाच्या रूग्णांना तात्पुरत्या स्वरूपात वापरता यावे साठी विद्युत अभियांत्रिकी शाखेचा युवक सोहेल इब्राहिम सय्यद याने कॉरंटाइनच्या काळात घरी उपलब्ध असलेल्या इलेक्ट्रॉनिकचे उपकरणाच्या साहित्यातून व्हेंटिलेटर बनवले आहे. सध्या लॉकडाऊन असल्यामुळे काही इलेक्ट्रॉनिक वस्तू घरांमध्ये उपलब्ध नाहीत त्या मिळालल्यास हे व्हेंटिलेटर अजुन उत्कृष्ठ पणे बनवता येईल या व्हेंटिलेरचे नामकरण "जीवा" असे करण्यात आले आहे.
जामखेड - सध्या व्हेंटिलेटरची आवश्यकता पाहता कोरोनाच्या रूग्णांना तात्पुरत्या स्वरूपात वापरता यावे साठी विद्युत अभियांत्रिकी शाखेचा युवक सोहेल इब्राहिम सय्यद याने कॉरंटाइनच्या काळात घरी उपलब्ध असलेल्या इलेक्ट्रॉनिकचे उपकरणाच्या साहित्यातून व्हेंटिलेटर बनवले आहे. सध्या लॉकडाऊन असल्यामुळे काही इलेक्ट्रॉनिक वस्तू घरांमध्ये उपलब्ध नाहीत त्या मिळालल्यास हे व्हेंटिलेटर अजुन उत्कृष्ठ पणे बनवता येईल या व्हेंटिलेरचे नामकरण "जीवा" असे करण्यात आले आहे.
संकटाच्या परिस्थितीत लोकांच्या सेवेत आपला योगदान होईल या प्रामाणिक भावनेतून व्हेंटिलेटर बनवण्याची कल्पना घरी क्वारंटाइनमध्ये असताना कुटूंबातील प्रमुख सात नातेवाईकांपुढे सोहेल सय्यद याने मांडली त्यांनी त्यास तात्काळ होकार दिला. मुळचा विद्युत अभयांत्रिकी शाखेचा पिंड असल्याने घरात असलेल्या नादुरुस्त ओव्हन, फ्रिज, पाण्याची छोटी मोटर, एसी यामधील आवश्यक असणाऱ्या वस्तू काढल्या चार दिवसाच्या अथक परिश्रमानंतर व्हेंटिलेटर तयार केले.
देशामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले आहे.दररोज हजारो कोरोना बाधितांचा मृत्यू होत आहे.अशा प्रसंगी सर्वच आरोग्य सेवा कमी पडत आहेत. त्यामुळे संपूर्ण जग या कोरोना बाबत विविध औषधे तयार करत आहेत तर कोणी वेंटीलेटर तयार करत आहेत. प्रत्येक व्यक्ती आपआपल्यापरीने काम करत आहेत. त्यामुळे आपण ही आपल्या ज्ञानाचा उपयोग करून वेंटीलेटर तयार करू शकतो अशी भावना झाली व घरातील उपलब्ध इलेक्ट्रॉनिकच्या टाकाऊ वस्तू पासून जीवन आणि वायु प्रदान करणारा जीवा व्हेंटिलेटर सोहेल सय्यद याने तयार केले आहे.
सध्या जे तयार केलेले व्हेंटिलेटर मध्ये इलेक्ट्रॉनिक कॉम्पेंटटस कमी आहे जे स्कॅप मध्ये उपलब्ध नसते जर हे साहित्य लॉकडाऊन नंतर उपलब्ध झाले तर वेंटीलेटर अजुन उत्कृष्ठ पणे काम करेल जर वेंटीलेटरची गरज भासल्यास हा कमी खर्चात शासनाला उपलब्ध होऊ शकतो. कमी खर्चात आणि कमी वेळात हे वेंटीलेटर मोठ्याप्रमाणात उपलब्ध होऊ शकतात. यासाठी शासनच्या वैद्यकीय विभागाने यांची दखल घेणे गरजेचे आहे.
चौकट
सोहेल सय्यद हा विद्युत अभयांत्रिकीचा विद्यार्थी असून शिक्षण झाल्यानंतर पुणे येथील नामांकित खाजगी एमएनसी कंपनीत काम केले परंतु ती सोडून देऊन लोकांना रोजगार निर्माण करून द्यावा या प्रामाणिक भावनेतून Wipz.in by Delux Enterprise या नावाने स्वतःच बांधकाम क्षेत्रात व्यवसाय सुरू केला. व्यवसायात चांगला प्रतिसाद मिळाला व अवघ्या 3 महिन्यात दिल्ली येथे बांधकाम क्षेत्रातील Youngest CEO या पुरस्कारासोबत सोहेल इब्राहिम सय्यद सन्मान देखील करण्यात आला आहे.
--
चुलते इस्माईल सय्यद जामखेड ग्रामपचायतचे माजी सदस्य एक सामाजिक कार्यकर्ते आहेत तर वडील इब्राहिम सय्यद हे व्यावसायिक आहे भाऊ साहिल सय्यद हा फार्मसीचा विद्यार्थी आहे. यासर्वांची प्रेरणा घेऊनच हे वेंटीलेटर तयार करण्यात आले आहेत. म्हणून जिवा नामकरण व्हेंटिलेटरचे करताना मी वैज्ञानिक भावनाच नव्हे तर महाराष्ट्रचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीव वाचविणारे शुर सरदार जिवा महाले यांच्या नावाने प्रेरीत होऊन हे नाव घेण्यात आले असल्याचे सोहेल सय्यद यांनी सांगितले.