मांचीहिल कोविड केअर सेंटरला व्हेंटिलेटर, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:19 AM2021-05-23T04:19:44+5:302021-05-23T04:19:44+5:30
ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय मागील वर्षीही कोविड-१९ च्या परिस्थितीत सुरू होते. याही वर्षी महाराष्ट्र शासनाने हे रुग्णालय कोविड ...
ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय मागील वर्षीही कोविड-१९ च्या परिस्थितीत सुरू होते. याही वर्षी महाराष्ट्र शासनाने हे रुग्णालय कोविड केअर सेंटरसाठी अधिग्रहित केलेले असून, आतापर्यंत हजारो रुग्णांनी याठिकाणी उपचार घेत कोरोनावर यशस्वी मात केलेली आहे. बाधित रुग्णांना याठिकाणी कोरोना उपचाराबरोबरच उच्चप्रशिक्षित डॉक्टरांचे मार्गदर्शन, योगा प्रशिक्षण, पौष्टिक आहार व आयुर्वेदिक काढे मोफत दिले जातात. संस्थेचे संस्थापक ॲड. शाळीग्राम होडगर यांच्या वतीने रुग्णांना दररोज अंडी, फळे व दूध यांचे मोफत वाटप करण्यात येते. याचा परिणाम म्हणून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त आहे. सद्यस्थितीत कोरोनाची भयावह परिस्थिती पाहता मांचीहिल कोविड केअर सेंटरला व्हेंटिलेटर व ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन भेट मिळाल्याने आश्वीसह पंचक्रोशीतील बाधित रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, यावेळी शाह बंधूचे स्वागत व आभार मांचीहिल शैक्षणिक संकुलाचे संस्थापक ॲड. शाळीग्राम होडगर यांनी मानले. याप्रसंगी संस्थेचे लेखापाल राजू बोंद्रे, संस्थेचे संचालक अण्णासाहेब बलमे, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शिवपाल खंडीझोड, रुग्णालयाचे समन्वयक दत्ता शिंदे, महाविद्यालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.