मजलेशहरमध्ये ज्ञानेश्वर ग्रामविकास मंडळाचा विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:21 AM2021-01-25T04:21:18+5:302021-01-25T04:21:18+5:30
भातकुडगाव : शेवगाव तालुक्यातील मजलेशहर ग्रामपंचायत निवडणुकीत ज्ञानेश्वर ग्रामविकास मंडळाने सर्व नऊ जागा जिंकून वर्चस्व मिळविले. भारतीय जनता ...
भातकुडगाव : शेवगाव तालुक्यातील मजलेशहर ग्रामपंचायत निवडणुकीत ज्ञानेश्वर ग्रामविकास मंडळाने सर्व नऊ जागा जिंकून वर्चस्व मिळविले. भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष ताराचंद लोढे यांच्या शेतकरी ग्रामविकास मंडळाला पराभवाला सामोरे गेले.
मागील पंचवार्षिक निवडणुकीत पाच जागा जिंकून भाजपच्या ताराचंद लोढे यांनी सत्ता मिळवली होती. सरपंचपदाचा उमेदवार न्यायालयीन कचाट्यात सापडल्याने सुरवातीचे एक वर्षे वगळता येथे सरपंचपद रिक्तच राहिले होते. उपसरपंच रवींद्र लोढे यांनी पाच वर्षे गाव कारभार चालवत तारेवरची कसरत करावी लागली.
ज्ञानेश्वर ग्रामविकास मंडळाचे विजयी उमेदवार असे : मनोज देवदान दळवी, आरती ज्ञानेश्वर लोढे, गायत्री अशोक लोढे, पांडुरंग दिलीप लोढे, शिवाजी दादा मगर, अमृता ज्ञानेश्वर फटांगरे, मारुती अंबादास खरात, शारदा पोपट मुगुटमल, विद्या अशोक लोढे.
विजय मिळविण्यासाठी ज्येष्ठ कार्यकर्ते रावसाहेब लोढे, माजी सरपंच विक्रम लोढे, माजी उपसरपंच हरिराम मगर, माजी सरपंच रवींद्र लोढे, नारायण लोढे, जनार्धन लोढे, रंगनाथ मगर, सखाराम लोढे, आप्पासाहेब फटांगडे, दिनकर फटांगडे, हरिश्चंद्र नरवडे, भारत लोढे, त्रिंबक बोरुडे, अशोक बोरुडे, मच्छिंद्र आर्ले, रमेश पहिलवान, पोपट मुगुटमल, शिवाजी लोढे, सर्जेराव गायकवाड, दिलबर पठाण आदींनी परिश्रम घेतले.