VIDEO : नगरच्या भुईकोट किल्ल्यात होता पंडित नेहरूंचा अडीच वर्ष मुक्काम

By Admin | Published: May 26, 2017 05:58 PM2017-05-26T17:58:23+5:302017-05-26T21:29:34+5:30

- आॅनलाइन लोकमत/योगेश गुंड अहमदनगर, दि.26 -  भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासह इतर राष्ट्रीय नेत्यांना नगर येथील ...

VIDEO: Pandit Nehru spent two and a half years in the Fort Fort in the fort | VIDEO : नगरच्या भुईकोट किल्ल्यात होता पंडित नेहरूंचा अडीच वर्ष मुक्काम

VIDEO : नगरच्या भुईकोट किल्ल्यात होता पंडित नेहरूंचा अडीच वर्ष मुक्काम

- आॅनलाइन लोकमत/योगेश गुंड

अहमदनगर, दि.26 -  भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासह इतर राष्ट्रीय नेत्यांना नगर येथील भुईकोट किल्ल्यात बंदिवासात ठेवण्यात आले होते. पंतप्रधान होण्याच्या आधी दहा वर्षे म्हणजे १९४२ च्या स्वातंत्र्य चळवळीत त्यांचा सुमारे अडीच वर्षांचा काळ या किल्ल्यात गेला.
बंदिवासाच्या काळातच नेहरू यांनी जगप्रसिद्ध ‘डिस्कवरी आॅफ इंडिया’ हा ग्रंथ भुईकोट किल्ल्यात शब्दबद्ध केला. त्या ग्रंथाची १ हजार पाने त्यांनी येथे लिहिली. त्याच्या काही प्रती ते ज्या खोलीत बंदिवासात होते, तेथे जतन करण्यात आल्या आहेत. याचबरोबर त्यांनी दैनंदिन वापरलेल्या वस्तू, खुर्ची, टेबल, बिछाना, काही भांडी, त्यांनी लिहिलेली पत्रे येथे पहावयास मिळतात.
सकाळी ७.३० ते ८ नाश्ता, दुपारी वाचन व लेखन, जेवणानंतर दुपारी बॅडमिंटन खेळणे, त्यानंतर पुन्हा वाचन व लेखन, व्यायाम, रात्री साडेआठला जेवण व नऊ वाजता झोपणे असा पंडितजींचा त्या वेळचा दिनक्रम होता.
पंडित नेहरुंना नगरच्या किल्ल्यात बागकाम करण्याची आवड जडली. फुलांची आवड असल्याने ते सर्वात आधी उठून बागकामात रंगून जात. किल्ल्यातील अनेक झाडांचे त्यांनी जतन केले. नगरची बासुंदी आणि आंबेमोहोर तांदळाची त्यांना आवड होती. येथील मोतीलाल फिरोदिया हे त्यावेळी पंडितजींचे यजमान होते. ते पंडितजींसाठी ‘बंबईवाला’ यांची बासुंदी, तर भिंगार येथील मिश्रीलाल भंडारी यांच्या रेशनच्या दुकानांतील आंबेमोहोर तांदूळ किल्ल्यात पाठवत असत.

पंतप्रधान झाल्यानंतर दोनदा किल्ल्याला भेट
आपल्या जीवनातील अडीच वर्षांचा काळ ज्या किल्ल्यात घालवला त्याच्या आठवणी पंडितजींच्या मनात कायम राहिल्या, म्हणूनच पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी १९५२ आणि १९६१ अशा दोन वेळी नगरला भेट दिली. या आपल्या भेटीत त्यांनी आवर्जून किल्ल्याला भेट देऊन आपली खोली, आपण घालवलेल्या ठिकाणची पाहणी करून जुन्या आठवणींना उजाळा दिला.

 

 

{{{{dailymotion_video_id####x844zov}}}}

 

Web Title: VIDEO: Pandit Nehru spent two and a half years in the Fort Fort in the fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.