Video: पुलीस साहेबांनी मला बाहेरच अडवलं, अण्णांना भेट न दिल्यानं घनश्यामला रडू कोसळलं
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 07:16 PM2019-02-05T19:16:13+5:302019-02-05T19:17:17+5:30
ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंचं गेल्या 7 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अण्णांचे मन वळविण्यासाठी राळेगणमध्ये दाखल झाले आहेत.
अहमदनगर - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे गेल्या 7 दिवसांपासून राळेगणसिद्धी येते उपोषण सुरू आहे. या उपोषणाला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पाठींबा दर्शविल्यापासून इतरही राजकीय पक्षांनी आण्णांच्या भेटीसाठी रीघ लावली आहे. त्यातच, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अण्णा हजारेंची भेट घेतली. तत्पूर्वी छोटा पुढारी धनश्याम दरोडेही अण्णांच्या भेटीला गेला होता. मात्र, पोलिसांनी घनश्यामला दारातच अडवले. त्यामुळे घनश्यामला रडू कोसळले.
ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंचं गेल्या 7 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अण्णांचे मन वळविण्यासाठी राळेगणमध्ये दाखल झाले आहेत. तब्बल चार तासांपासून अण्णांशी चर्चा सुरु असून केंद्रिय कृषिमंत्री राधामोहन सिंग बैठकीतून निघून गेले. शेतकऱ्यांना हमी भाव मिळावा, कृषी मूल्य आयोगाला स्वायत्ता मिळावी, स्वामिनाथन आयोग कोणताही आडपडदा न ठेवता लागू करावा, या भूमिकेवर अण्णा ठाम आहेत. त्यामुळे केंद्रिय कृषिमंत्री राधामोहन सिंग पाच वाजण्याच्या सुमारास बैठकितून निघून गेले. तत्पूर्वी छोटा पुढारी म्हणून प्रसिद्ध असलेल्या घनश्याम दरोडेनेही राळेगणसिद्धीत हजेरी लावली होती. मी अण्णांचा शिष्य असून अण्णा माझे गुरू असल्याचं सांगत घनश्यामने राळेगणसिद्धीत भाषणही केले. मात्र, घनश्यामला अण्णांच्या भेटीसाठी जाऊ न दिल्याने तो नाराज झाला आहे. पोलीस साहेबांनी अण्णांची भेट घेऊ न दिल्याचे सांगताना घनश्यामला रडू कोसळले.
मला अण्णांकड का जाऊन देत नाहीत, म्हणून मला रडायला येत होतं. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सरकारला जागं करायच काम आम्ही करत आहोत. सरकारला माझं कळकळीच सांगण आहे, की अण्णांच्या मागण्या मान्य कराव्यात, असे घनश्यामने म्हटले आहे.
पाहा व्हिडीओ -