पाथर्डीत मतदान करतानाचा व्हिडीओ व्हायरल; गुन्हा दाखल, श्रीगोंद्यात पैसे वाटताना दोघे ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2019 05:31 PM2019-10-21T17:31:03+5:302019-10-21T17:31:29+5:30
मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास बंदी असतानाही मतदान करतानाचा व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना पाथर्डी तालुक्यातील डांगेवाडी मतदान केंद्रावर घडली. तर श्रीगोंदा मतदारसंघात मतदारांना पैसे वाटप करताना दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत माहिती अशी की, शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात पाथर्डी तालुक्यातील डांगेवाडी मतदान केंद्रावर सोमवारी दुपारी एका मतदाराने स्वत:चा मतदान करतानाचे मोबाईलमध्ये व्हिडिओ चित्रण केले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. या अज्ञात व्यक्तीविरोधात निवडणूक निर्णय अधिकाºयांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. या व्हिडीओमध्ये मतदाराने भाजपच्या उमेदवार मोनिका राजळे यांना मतदान केल्याचे दिसत आहे. मोबाईल बंदी असताना हे कृत्य घडलेच कसे याची चर्चा मतदारसंघात सुरू होती.
अहमदनगर : मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास बंदी असतानाही मतदान करतानाचा व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना पाथर्डी तालुक्यातील डांगेवाडी मतदान केंद्रावर घडली. तर श्रीगोंदा मतदारसंघात मतदारांना पैसे वाटप करताना दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत माहिती अशी की, शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात पाथर्डी तालुक्यातील डांगेवाडी मतदान केंद्रावर सोमवारी दुपारी एका मतदाराने स्वत:चा मतदान करतानाचे मोबाईलमध्ये व्हिडिओ चित्रण केले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. या अज्ञात व्यक्तीविरोधात निवडणूक निर्णय अधिकाºयांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. या व्हिडीओमध्ये मतदाराने भाजपच्या उमेदवार मोनिका राजळे यांना मतदान केल्याचे दिसत आहे. मोबाईल बंदी असताना हे कृत्य घडलेच कसे याची चर्चा मतदारसंघात सुरू होती.
दुसरी घटना श्रीगोंदा मतदारसंघात तालुक्यातील टाकळी कडेवळीत येथे घडली. येथे भाजपच्या दोन कार्यकर्त्यांना पैसे वाटप करताना पकडले. त्यांच्याकडून १४ हजारांची रक्कम जप्त केली आहे. या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस या दोघांची कसून चौकशी करीत आहेत. दरम्यान, पाच वाजेनंतर जिल्ह्यातील जवळपास सर्वच मतदारसंघातील केंद्रावर रांगा लागल्या होत्या.