गोदाकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 01:02 AM2018-07-18T01:02:40+5:302018-07-18T01:04:06+5:30
सायखेडा/चांदोरी : धरण क्षेत्रावर पावसाची संततधार सुरू असल्याने गंगापूर धरण आणि दारणा धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने गोदावरी नदीच्या पाण्यात वाढ झाली आहे. गोदाकाठ भागातील गावांना प्रशासनामार्फत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

गोदावरी नदीच्या पुलाला पुराचे पाणी लागले असून, पाणवेली अडकल्याने पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होत आहे. प्रशासनामार्फत पाणवेली काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, पुलाला अडकलेल्या पाणवेली धोका ठरण्याची शक्यता आहे. धरणातील पाणी आणि नदीच्या परिसरात सुरू असलेला रिमझिम पाऊस यामुळे पाणी पातळीत वाढ झाल्याने नदीच्या आजूबाजूच्या भागातील पिके पाण्याखाली गेली आहेत. नदी परिसरात मोठ्या प्रमाणात बागायती शेती असल्याने काळ्या कसदार जमिनीत नगदी पिके पाण्याखाली गेल्याने खराब होण्याची शक्यता वर्तविली जात आहे तर अनेक ठिकाणी वीटभट्ट्या पाण्यात बुडल्याने मोठे नुकसान झाले आहे.
सर्वात जास्त फटका गोदाकाठाला
नदीला पाणी सोडल्यानंतर सर्वात जास्त फटका गोदाकाठ भागातील
गावांना बसतो. पावसाळ्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण होत
असते.
४नांदूरमधमेश्वर धरणाचे दरवाजे उघडले असले तरी सखोल भाग असल्याने चांदोरी, सायखेडा, करंजगाव, चाटोरी, शिंगवे या गावांना सर्वाधिक फटका बसतो.
४सायखेडा बाजारपेठ, गंगानगर, मेनरोड, सायखेडा चौफुली या भागातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.