विखे, काळे, तनपुरे, ढाकणे यांचे उमेदवारी अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2019 01:57 PM2019-10-04T13:57:18+5:302019-10-04T13:57:48+5:30
विधानसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी राज्याचे गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आशुतोष काळे, प्रताप ढाकणे, प्राजक्त तनपुरे, राजेश परजणे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केले.
अहमदनगर : विधानसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी राज्याचे गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आशुतोष काळे, प्रताप ढाकणे, प्राजक्त तनपुरे, राजेश परजणे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केले.
राधाकृष्ण विखे यांनी शिर्डी मतदारसंघातून राहाता येथे भाजपकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. कोपरगाव मतदारसंघातून शंकरराव काळे कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून तर राधाकृष्ण विखे यांचे मेहूणे जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. राहुरी मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्राजक्त तनपुरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शेवगाव-पाथर्डी मतदार संघातून केदारेश्वर कारखान्याचे अध्यक्ष अॅड. प्रताप ढाकणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला. नगर शहरातून माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी बहुजन समाज पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला. श्रीरामपूर मतदार संघातून शिवसेनेतर्फे काँग्रेसचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी उमेदवारी दाखल केला आहे. तर काँग्रेसकडून लहू कानडे यांनी अर्ज दाखल केला आहे.