विखे-थोरात एकमेकांविरुद्ध लढत नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:26 AM2021-08-25T04:26:09+5:302021-08-25T04:26:09+5:30
मुरकुटे म्हणाले, राहाता मतदारसंघातून डॉ.सुधीर तांबे यांना विखेंविरुद्ध उमेदवारी देण्याची मागणी आपण थोरात यांच्याकडे केली होती; मात्र त्यांनी सुरेश ...
मुरकुटे म्हणाले, राहाता मतदारसंघातून डॉ.सुधीर तांबे यांना विखेंविरुद्ध उमेदवारी देण्याची मागणी आपण थोरात यांच्याकडे केली होती; मात्र त्यांनी सुरेश थोरात यांना संधी दिली. दुसरीकडे विखे यांनीही संगमनेरमधून डमी उमेदवार दिला. दोघेही एकमेकांविरुद्ध लढत नाहीत. इतरांना मात्र लढायला लावतात. निळवंडे धरणाच्या झालेल्या कालव्यांमुळे विखे यांनीही स्वत:च्या तालुक्यातील भाग जोडून घेतला. मंत्री बाळासाहेब थोरात व माजी मंत्री मधुकर पिचड यांनीही निळवंडेचा लाभ घेतला. ऊर्जामंत्री प्राजक्त तनपुरे यांचे मामा पाटबंधारे मंत्री आहेत. त्यांच्या मदतीने राहुरीची काही गावे निळवंडेच्या लाभक्षेत्रात घेण्यात आली. श्रीरामपूर तालुक्यावर मात्र अन्याय झाला आहे. आता आपण राजकीयदृष्ट्या सर्वांना सोबत घेण्याचे ठरविले आहे. मंत्री थोरात आले तर त्यांना टाळी देतो, विखे आले तर त्यांना देतो, असे मुरकुटे म्हणाले. त्यावेळी उपस्थितांमध्ये हशा पिकला.
-------
प्रवरेने शैक्षणिक शुल्क माफ केले
राधाकृष्ण विखे म्हणाले, प्रवरा शिक्षण संस्थेने या वर्षी पॉलिटेक्निक, फार्मसी, इंजिनिअरिंग या सर्वच व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या पहिल्या वर्षाचे शैक्षणिक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला. कोविडमुळे आर्थिक संकटातील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.
----------