9 मे पासून नगर जिल्ह्यात मराठा आरक्षणा संदर्भात गाव बंद आंदोलन- संभाजी दहातोंडे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 01:23 PM2021-05-05T13:23:22+5:302021-05-05T13:23:39+5:30
8 तारखेला पदाधिकारी, समन्वयकाची बैठक
नगर : मराठा नेते मराठा समाजाचे आरक्षण न्यायालयाने रद्द केल्यामुळे मराठा समाजात संताप व्यक्त केला जात आहे. मराठा क्रांती मोर्चा समन्वय समिती मराठा महासंघाचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. राज्य सरकारने योग्य भूमिकांना मांडल्यामुळे आरक्षण रद्द झाल्याचा निषेध करत मराठा महासंघातर्फे 9 मे पासून नगर जिल्ह्यातून आंदोलनाला सुरुवात केली जात आहे. त्यासाठी आठ मे रोजी नगर येथे मराठा क्रांती मोर्चा, मराठा महासंघ, शेतकरी मराठा महासंघाच्या समन्वयकाची बैठक आयोजित केली असल्याची माहिती शेतकरी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजीराव दहातोंडे पाटील यांनी दिली.
मराठा समाजाला दिले जाणारे आरक्षण रद्द केले आहे. त्यामुळे मराठा समाजामध्ये तीव्र संतापाची भावना तयार झाली आहे. ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी, कामगार, मराठा समाजाच्या कुटुंबातील अनेक तरुणांच्या आशेवर पाणी फिरले आहे. मराठा समाजाने आरक्षणासाठी चालवलेल्या अनेक वर्षाच्या लढा वरही विरजण पडले आहे. महाराष्ट्र सरकारने न्यायालयात मराठा समाज मागास कसा आहे हे, प्रभावीपणे न मांडल्यामुळे न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले आहे. तर भारतीय जनता पार्टीचे सरकार असताना मराठा आरक्षण दिले परंतु या सरकारने ते टिकवले नाही.
मराठा आरक्षण रद्द केल्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी आता महाराष्ट्र सरकार नेमकं काय करणार? राज्य सरकार नेमकी काय भूमिका काय असेल हे शासनाने स्पष्ट करावे अशी मागणी करत मराठा आरक्षण रद्द झाल्याचा निषेध करत नऊ मेपासून मराठा महासंघ शेतकरी मराठा महासंघ मराठा समितीतर्फे गाव बंद आंदोलन करण्यात येणार आहे. त्यासाठी आठ मे रोजी नगर येथील शासकीय विश्रामगृहावर सर्व पदाधिकारी समन्वयक्कांची बैठक होणार होणार आहे त्यासाठी पदाधिकारी समन्वयकांनी बैठकीला हजर राहावे असे आवाहन संभाजी दहातोंडे यांनी केले आहे.