ग्रामसमितीने सक्रियपणे काम करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:20 AM2021-04-10T04:20:31+5:302021-04-10T04:20:31+5:30
राहुरीत तालुक्यातील मांजरी येथे शुक्रवारी सकाळी वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपायोजना राबविण्यासाठी २० गावांतील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस ...
राहुरीत तालुक्यातील मांजरी येथे शुक्रवारी सकाळी वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपायोजना राबविण्यासाठी २० गावांतील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, वैद्यकीय अधिकारी, आशा सेविका, मुख्याध्यापक यांच्यामध्ये संयुक्त बैठक घेण्यात आली. त्यावेळी शेख बोलत होते.
प्रांताधिकारी दयानंद जगताप, गटविकास अधिकारी गोविंद खामकर, तालुका वैद्यकीय अधिकारी दीपाली गायकवाड, मांजरी केंद्राचे आरोग्य अधिकारी मल्हारी कौतुके यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
शेख म्हणाले, कोरोनाबाधित रुग्ण आढळले तर त्यांच्या संपर्कातील व्यक्तींच्या रॅपीड ॲन्टीजेन टेस्ट करा. जेथे १५ पेक्षा अधिक रुग्ण सापडले तेथे झोन घोषित करा. तो परिसर सील करा. प्रशासनाला सहकार्य केले नाही तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा. सर्वांनी जबाबदारीने काम करा. अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
यावेळी मांजरी, वांजुळपोई, तिळापूर, पाथरे, कोपर, शेणवडगाव, मालुंजे, माहेगाव, महाडूक सेंटर, खुडसारगाव, वळण, पिंपरी, चांडकपुर, मानोरी, केंदळ, शिलेगाव, आरडगाव, तांदुळवाडी, कोंढवड या गावातील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलिस पाटील, आशा सेविका, मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते. सरपंच विठ्ठल विटनोर, चेअरमन अशोक विटनोर यांनी आभार मानले.
..............
मास्क वापरा. मोठ-मोठ्या उपाययोजनांपेक्षा मास्क वापरणे सोपे आहे. तेच जबाबदारीने वापरा. कोरोना आपोआप आटोक्यात येईल. जीव जाण्यापेक्षा जीव ओतून काम करा. विनाकरण गर्दी करू नका. शनिवार -रविवार पूर्णपणे बंद पाळा. आणि प्रशासनाला सहकार्य करा.
- गोविंद खामकर, गटविकासाधिकारी