राळेगणसिद्धी ‘उर्जा’ देणारे गाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 03:12 PM2017-11-04T15:12:20+5:302017-11-04T15:22:43+5:30

अहमदनगर : राळेगणसिद्धीतून देशाला विकासाची उर्जा मिळते. देशातील पहिला पथदर्शी सौरउर्जा प्रकल्पही राळेगणसिद्धीतून सुरू होत आहे. सौरउर्जा प्रकल्पामुळे शेतक-यांना मुबलक वीज मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

 Village of Ralegansiddhi 'energy' | राळेगणसिद्धी ‘उर्जा’ देणारे गाव

राळेगणसिद्धी ‘उर्जा’ देणारे गाव

ठळक मुद्देमुख्यमंत्री : सौरप्रकल्पाचे भूमिपूजन

अहमदनगर : राळेगणसिद्धीतून देशाला विकासाची उर्जा मिळते. देशातील पहिला पथदर्शी सौरउर्जा प्रकल्पही राळेगणसिद्धीतून सुरू होत आहे. सौरउर्जा प्रकल्पामुळे शेतक-यांना मुबलक वीज मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
राळेगणसिद्धी (ता. पारनेर) येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजनेच्या सौर प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. या कार्यक्रमास ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे, खासदार दिलीप गांधी, आ. विजय औटी, आ. शिवाजी कर्डिले आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, सौर उर्जा प्रकल्प आणि ग्रामसुरक्षा दल कायद्याची अंमलबजावणी देशात राळेगणसिद्धीतूनच प्रथम होत आहे. अण्णा हजारे आणि पोपटराव पवार हे दोन विकासपुरुष राळेगणसिद्धीने देशाला दिले आहेत. त्या अर्थाने राळेगणसिद्धी हे देशाला ‘उर्जा’ देणारे गाव आहे. तीन महिन्यात राळेगणसिद्धीतील सौरप्रकल्प पूर्ण होईल. सौरउर्जा प्रकल्पाची अन्य राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी विचारणा सुरू झाली आहे. पूर्वी सहा रुपये दराने वीज खरेदी करावी लागायची, ती आता अडीच रुपये प्रतियुनिट दराने वीज मिळणार आहे. त्यासाठी तोटा भरून काढण्यासाठी द्यावी लागणारी सरकारची दहा हजार कोटीची सबसिडी वाचणार आहे. सौर प्रकल्पामुळे शेतक-यांना बारा तास वीज मिळणार आहे.
ग्रामसुरक्षा दल कायद्याची अंमलबजावणीची जबाबदारी ही कायद्यापेक्षा ग्रामस्थांचीच आहे. हा कायदा करून थांबणार नाही तर अवैध दारुबाबत जागृती करण्याबाबत गावोगावी फिरणार असल्याचे अण्णा हजारे यांनी मला आश्वस्त केले आहे. त्यामुळे या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. तसेच पाणलोटाद्वारे विहीर पुर्नभरणाच्या माध्यमातून राज्यातील २० हजार गावे दुष्काळमुक्त करण्याचे नियोजन असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
--
सभेत गोंधळ
एका अपंग तरुणाला रोजगार मिळत नसल्याने त्याला मुख्यमंत्र्यांना भेटून निवेदन द्यायचे होते. त्याला पोलिसांनी अटकाव केल्याने पोलिसांचे सुरक्षाकडे तोडून त्याने मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली. यामुळे पोलिसांची धावपळ उडाली, तर सभेत गोंधळ झाला. सभेत बाटली भिरकावण्याचा कोणताही प्रकार झाला नाही.
---
 

Web Title:  Village of Ralegansiddhi 'energy'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.