राहुरीत वाळूची नाकेबंदी तोडली : वाळूचोर पसार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 05:36 PM2018-06-17T17:36:13+5:302018-06-17T17:37:20+5:30
मुळा नदी पात्रात चोरीस जाणारी वाळू रोखण्यासाठी शेतक-यांनी रस्ते खोदून वाळू तस्करांची नाकेबंदी केली होती़ चर बुजून वाळू नेण्याचा डाव राहुरीचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी हाणून पाडला.
राहुरी : मुळा नदी पात्रात चोरीस जाणारी वाळू रोखण्यासाठी शेतक-यांनी रस्ते खोदून वाळू तस्करांची नाकेबंदी केली होती़ चर बुजून वाळू नेण्याचा डाव राहुरीचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी हाणून पाडला.
रविवारी मुळा नदी पात्रात रस्त्यावर असलेल्या चरापैकी एक चर बुजून टाकण्यात आला़. चर बुजल्याची कुणकुण शेतक-यांना लागली़ वाळू उचलू नका. आमच्या मोटारी चोरीस जातात, असे शेतक-यांनी वाळू उचलेगिरी करणा-यांना सांगितले़ त्यानंतर पोलिस घटनास्थळी येणार असल्याची माहीती वाळू उचलणा-यांना मोबाईलवरून मिळाली़ पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी पोलिस हेडकॉन्स्टेबल कल्लू चव्हाण व पवार यांना मुळा नदी पात्रात पाठविले़ पोलिस येण्याची माहीती कळताच वाळूचा ढम्पर रिकामा करण्यात आला. त्यानंतर नदीच्या काठावर असलेल्या आंब्याच्या झाडाखाली टेम्पो लपविण्यात आला. त्यानंतर वाळू उचलणारे पळून गेले़ पोलिसांनी टेम्पो राहुरी पोलिस स्टेशनमध्ये आणला.