ग्रामस्थांनी अडविले समृद्धी महामार्गाचे डम्पर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:19 AM2021-01-22T04:19:23+5:302021-01-22T04:19:23+5:30
माजी सभापती टेके म्हणाले, समृद्धी महामार्गाच्या भरावासाठी या गाड्या रात्रंदिवस माती वाहत आहेत. ही माती वाहताना यांनी रस्त्यावर खड्डे ...
माजी सभापती टेके म्हणाले, समृद्धी महामार्गाच्या भरावासाठी या गाड्या रात्रंदिवस माती वाहत आहेत. ही माती वाहताना यांनी रस्त्यावर खड्डे केले. रस्त्यावर पाणी मारीत नाहीत आणि मारलेच तर चिखलच करतात. त्यावरून शाळकरी मुले, मुली, महिला, प्रवासी या रस्त्यावरून घसरून पडत आहेत. त्यामुळे अपघात होऊन नागरिक जखमी होत आहे. तसेच गावातील ओढेनाले उकरायचे सोडून सरळ शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी करून हे माती वाहत आहेत. त्या चांगल्या प्रकारे उकरतदेखील नाही. शेजारील जमिनीची नासाडी करायचे काम करीत आहेत.
विशेष म्हणजे ही माती वाहतूक करणाऱ्या डम्परला नंबरप्लेट नाही. समोरचे व मागचे लाइट नाही, दोन्ही बाजूंचे दिशादर्शक लाइट नाही, सायलेन्सर नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळी या वाहनाच्या कर्कश आवाजामुळे ग्रामस्थांंच्या झोपा उडाल्या आहेत. तसेच याच आवाजामुळे जनावरे दावे तोडतात. शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस, गहू, हरभरा, कांदे, ज्वारी या पिकांची धुळी, मातीमुळे पूर्णतः वाट लागली आहे. महत्त्वाचे म्हणजे, दुचाकीवर ट्रिपल सीट जाणाऱ्यांवर, हेल्मेट न घालणाऱ्यांंवर, आरसा लावला नाही म्हणून दंड करणारा आरटीओ विभाग अशा गाड्यांवर का कारवाई करीत नाही, असाही सवाल टेके यांनी यावेळी उपस्थित केला. यावेळी प्रकाश गोर्डे, माऊली वेताळ, अनिल गोरे, विशाल गोर्डे, सुधाकर ठोंबरे, दत्तू ठोंबरे, गोरख लांडगे, पोपट शिरसाठ, नानासाहेब टेके, अजित मेहरे, भगवान पठाडे, अशोक कानडे यांच्यासह उपस्थित होते.
........................
फोटो२१- समृद्धी डंपर अडविले- कोपरगाव
210121\img-20210121-wa0030.jpg
वारी ग्रामस्थांनी गुरुवारी ( दि.२१) समृद्धी महामार्गांसाठी वाहतूक करणारे डंपर अडविले होते.