साईदरबारातील जाचक नियमांविरुध्द ग्रामस्थ एकवटले; शिर्डी बंदचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2021 02:58 PM2021-01-27T14:58:11+5:302021-01-27T14:59:45+5:30

शिर्डी ग्रामस्थांना नियमांच्या जोखडात अडकावणा-या साईस्थानच्या एकतर्फी प्रयत्नाने शिर्डीकरांची सबुरी ऐरणीवर आली आहे. जाचक नियम लादण्याऐवजी सर्वसहमतीने आचारसंहिता ठरवणे गरजेचे झाले आहे.

The villagers rallied against the oppressive rules of Sidarbar; Shirdi closure warning | साईदरबारातील जाचक नियमांविरुध्द ग्रामस्थ एकवटले; शिर्डी बंदचा इशारा

साईदरबारातील जाचक नियमांविरुध्द ग्रामस्थ एकवटले; शिर्डी बंदचा इशारा

शिर्डी : ग्रामस्थांना नियमांच्या जोखडात अडकावणा-या साईस्थानच्या एकतर्फी प्रयत्नाने शिर्डीकरांची सबुरी ऐरणीवर आली आहे. जाचक नियम लादण्याऐवजी सर्वसहमतीने आचारसंहिता ठरवणे गरजेचे झाले आहे.

ग्रामस्थांच्या मागणीवर २९ जानेवारीपर्यंत निर्णय घेतला नाही तर ३० जानेवारीला गाव बंद ठेवून मोर्चा व उपोषणाचा मार्ग अवलंबवण्यात येईल, असा इशारा सर्वपक्षीयांच्या वतीने कैलास कोते, डॉ. एकनाथ गोंदकर, कमलाकर कोते, अभय शेळके, निलेश कोते आदींनी दिला.

ग्रामस्थ व पत्रकारांसाठी नियमावली करण्याच्या संस्थानच्या एकतर्फी प्रयत्नांना विरोध सुरू झाला आहे. पंढरपूर, तुळजापूर, कोल्हापूरसारख्या जुन्या देवस्थांनाच्या ठिकाणीही ग्रामस्थांना वर्षानुवर्षे हक्क आहेत. संस्थानने तिरूपती देवस्थान नजरेसमोर ठेवतांना तेथील भौगोलिक परिस्थीती विचारात घेतली नसावी. तिरूपतीचे तंत्रज्ञान जसे उत्तम तसेच शेगावचे दर्शनही आनंददायी आहे. चांगल्या बाबींचे अनुकरण करतांना स्थानिक परिस्थीती व तेथील गरजा दुर्लक्षित करता येणार नाहीत.

 

सीईओ कान्हुराज बगाटे यांच्या कार्य पद्धतीबद्दल आक्षेप असतील पण त्यांच्या हेतूबद्दल, भरपूर वेळ देण्याबद्दल व प्रामाणिक प्रयत्नांबद्दल शंका नाही. सध्या व्हीआयपींना जेवढा सन्मान मिळतो त्यातील थोडासा सामान्य भक्त, ग्रामस्थ व पत्रकारांच्या पारड्यातही पडावा. लवचिकता व समन्वयाचा अभाव असलेल्या प्रशासनाच्या एकतर्फी भूमिकेवर ग्रामस्थ, पत्रकार, कर्मचारी नाराज आहेत. याबाबत आत्मचिंतन करण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.

अनेक वर्षांपासून काही जणांनी मंदिरात गोरखधंदे सुरू केले आहेत, याबाबत भक्त व सुज्ञ ग्रामस्थही नाराज आहेत. साईदरबारातील अपप्रवृत्ती दूर करून मंदिराचे पावित्र्य व आपला सन्मान अबाधित ठेवण्यासाठी नियमावलीची नाही तर आचारसंहितेची गरज आहे.

सध्या साईदर्शन आनंददायी झाले आहे़ यात दर्शनार्थींची थोडी संख्या वाढवली. द्वारकामाईचे दर्शन पूर्ववत केले आहे. महाद्वारातील वावर सुरू केला तर अर्थव्यवस्थेचा गाडा रूळावर यायला मदत होईल, असे मत नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी व्यक्त केले.

ग्रामस्थांबरोबरच चर्चा करून हा प्रश्न सोडवण्यास आम्ही तयार आहोत. ग्रामस्थांनीच उपाययोजना सुचवाव्या. कोवीड संपल्यानंतर सध्याचे नियम आणखी शिथील होतील.

         -कान्हुराज बगाटे, मुख्य कार्यकारी अधिकारी, साईसंस्थान.

Web Title: The villagers rallied against the oppressive rules of Sidarbar; Shirdi closure warning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.