ग्रामस्थांनी सतर्क राहावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:21 AM2021-03-31T04:21:11+5:302021-03-31T04:21:11+5:30
आमदार बबनराव पाचपुते यांचे कोविड-१९ संदर्भात आढावा बैठक झाली. या बैठकीला श्रीगोंद्याच्या उपविभागीय अधिकारी स्वाती दाभाडे, ...
आमदार बबनराव पाचपुते यांचे कोविड-१९ संदर्भात आढावा बैठक झाली.
या बैठकीला श्रीगोंद्याच्या उपविभागीय अधिकारी स्वाती दाभाडे, तहसीलदार प्रदीप पवार, मुख्याधिकारी मंगेश देवरे, पोलीस निरीक्षक राम ढिकले, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संघर्ष राजुळे, प्रा. तुकाराम दरेकर, बापू गोरे, अशोक खेंडके, संतोष खेतमाळीस, संतोष क्षीरसागर उपस्थित होते.
पाचपुते म्हणाले, श्रीगोंदा तालुक्यासाठी श्रीगोंदा शहरामध्ये पूर्ववत कोविड सेंटर सुरू केले जावे. कोविड चाचण्यांची व्यवस्था केली जावी. मास्कचे आणि शारीरिक अंतर पाळण्याचे बंधन कडक करण्यात यावे. गर्दीवर नियंत्रण आणावे. स्वाती दाभाडे यांनी तालुक्यातील कोविड रुग्णांची सद्यस्थितीची माहिती आढावा बैठकीत दिली.