उंबरी बाळापूर ग्रामस्थांनी केले दोघांना गावातून हद्दपार; कारण त्यांनी...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 02:42 PM2020-02-26T14:42:22+5:302020-02-26T14:43:14+5:30
संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर गावातील रहिवासी शब्बीर शेख व इमामभाई शेख हे मागील अनेक वर्षांपासून वारंवार दारु पिऊन ग्रामस्थांना त्रास देतात. त्यामुळे या दोघांना हद्दपार करण्याचा ठराव विशेष ग्रामसभेत सोमवारी (दि.२४) मंजूर करण्यात आला.
आश्वी : संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर गावातील रहिवासी शब्बीर शेख व इमामभाई शेख हे मागील अनेक वर्षांपासून वारंवार दारु पिऊन ग्रामस्थांना त्रास देतात. त्यामुळे या दोघांना हद्दपार करण्याचा ठराव विशेष ग्रामसभेत सोमवारी (दि.२४) मंजूर करण्यात आला.
गावातील रहिवासी शब्बीर शेख व इमामभाई शेख हे मागील १० ते १५ वर्षांपासून गावातील लोकांना दारु पिऊन वारंवार शिवीगाळ करतात. महिलांना चाकू दाखवून अश्लील भाषेत बोलतात. दमबाजी करतात. लहान मुलांना शाळेत जाऊन भीती दाखवतात. शाळेतील शिक्षकांना मारहाण करुन अश्लील बोलणे. ग्रामपंचायत कर्मचा-यांकडे खंडणी मागणे. दुस-याच्या घरकुलाचा ताबा घेणे, अशा विविध घटना वारंवार घडत असल्याने गावात भितीचे
व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोघांवर तत्काळ गुन्हा नोंदवावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. याबाबत सोमवारी विशेष ग्रामसभा बोलावून दोघांना हद्दपार करण्याचा ठराव करण्यात आला आहे.
विशेष ग्रामसभेसाठी पद्मश्री डॉ. विखे पाटील कारखान्याचे संंचालक रामभाऊ भुसाळ, माजी पंचायत समिती सदस्य सरुनाथ उंबरकर, माजी संचालक भागवत उंबरकर, सरपंच किरण भुसाळ, उपसरपंच नानासाहेब उंबरकर, ग्रामसेवक आर. बी. गायकवाड, पोलीस पाटील वैशाली मैड, हेड कॉन्स्टेबल मोरे, सामाजिक कार्यकर्ते अशोक भुसाळ, भिकाजी खेमनर, अशोक उंबरकर, शिवाजी भुसाळ, काशीनाथ उंबरकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.