हिवरेबाजारच्या सरपंचपदी विमल ठाणगे; उपसरपंचपदी पोपटराव पवार; बु-हाणनगरला रावसाहेब करडीले तर उदरमलमध्ये जोसेफ भिंगारदिवे यांना सरपंचपदाची लॉटरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 01:11 PM2021-02-09T13:11:07+5:302021-02-09T13:12:00+5:30

आदर्शगाव  हिवरेबाजारच्या सरपंचपदी विमल ठाणगे तर उपसरपंचपदी पद्मश्री पोपटराव पवार यांची बिनविरोध निवड झाली. बु-हाणनगर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रावसाहेब करडीले यांची निवड झाली आहे. तर उदलमलमध्ये जोसेफ भिंगारदिवे यांना सरपंचपदाची लॉटरी लागली आहे.

Vimal Thanage as Sarpanch of Hivrebazar; Popatrao Pawar as Deputy Panch; Raosaheb Kardile in Bu-Hannagar and Joseph Bhingardive in Udarmal for Sarpanch post | हिवरेबाजारच्या सरपंचपदी विमल ठाणगे; उपसरपंचपदी पोपटराव पवार; बु-हाणनगरला रावसाहेब करडीले तर उदरमलमध्ये जोसेफ भिंगारदिवे यांना सरपंचपदाची लॉटरी

हिवरेबाजारच्या सरपंचपदी विमल ठाणगे; उपसरपंचपदी पोपटराव पवार; बु-हाणनगरला रावसाहेब करडीले तर उदरमलमध्ये जोसेफ भिंगारदिवे यांना सरपंचपदाची लॉटरी

अहमदनगर : आदर्श गाव  हिवरेबाजारच्या सरपंचपदी विमल ठाणगे तर उपसरपंचपदी पद्मश्री पोपटराव पवार यांची बिनविरोध निवड झाली. बु-हाणनगर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रावसाहेब करडीले यांची निवड झाली आहे. तर उदलमलमध्ये जोसेफ भिंगारदिवे यांना सरपंचपदाची लॉटरी लागली आहे.

हिवरबाजार ग्रामपंचायतीची ३० वषार्नंतर प्रथमच निवडणूक झाली होती. या निवडणुकीत पुन्हा पोपटराव पवार यांनी वर्चस्व सिध्द केले होते. दरम्यान, मंगळवारी (दि.९) सरपंच, उपसरपंच निवडी झाल्या. यात पोपटराव पवार यांची उपसरपंचपदी निवड झाली आहे. 

बु-हाणनगर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रावसाहेब करडीले यांची निवड झाली आहे. 

उदरमल ग्रामपंचायतीत ७ पैकी ६ जागा जिंकूनही सत्ताधारी गटाला विरोधी बाकावर बसावे लागले आहे. आरक्षणाचा उमेदवार नसल्याने येथे एकमेव निवडून आलेले जोसेफ भिंगारदिवे यांना सरपंचपदाची लॉटरी लागली आहे. 

Web Title: Vimal Thanage as Sarpanch of Hivrebazar; Popatrao Pawar as Deputy Panch; Raosaheb Kardile in Bu-Hannagar and Joseph Bhingardive in Udarmal for Sarpanch post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.