अटी-शर्तींचा भंग : १३६ छावण्यांना ४४ लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 07:32 PM2019-04-10T19:32:42+5:302019-04-10T19:33:44+5:30

जनावरांच्या छावण्या चालवताना छावणीचालकांनी अटी-शर्तींचे उल्लंघन केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी आतापर्यंत जिल्ह्यातील १३६ छावणीचालकांना ४४ लाख ३७ हजार ५६० रूपयांचा दंड ठोठावला आहे.

Violation of terms and conditions: 136 civic punishment for 44 lacs | अटी-शर्तींचा भंग : १३६ छावण्यांना ४४ लाखांचा दंड

अटी-शर्तींचा भंग : १३६ छावण्यांना ४४ लाखांचा दंड

अहमदनगर : जनावरांच्या छावण्या चालवताना छावणीचालकांनी अटी-शर्तींचे उल्लंघन केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी आतापर्यंत जिल्ह्यातील १३६ छावणीचालकांना ४४ लाख ३७ हजार ५६० रूपयांचा दंड ठोठावला आहे.
जिल्ह्यात सध्या २५० छावण्या सुरू आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकांद्वारे या छावण्यांची तपासणी करून तेथील सोयी-सुविधांचा आढावा घेतला जातो. छावणीत चारा आवक रजिस्टर नसणे, पशुखाद्य, मुरघास न देणे, आवक चारा व पशुखाद्य पंचनामा नसणे, जनावरांची संख्या दर्शवणारे फलक नसणे, कडबाकुट्टी, जनावरांना बिल्ले नसणे अशा अनेक त्रुटी आढळल्याने या छावणीचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
मंगळवारी (दि. ९) बारा छावण्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यामध्ये नगर तालुका खरेदी विक्री संघ (रूईछत्तीशी)३ लाख ९० हजार, झुलेलाल मजूर संस्था (साकत) १५ हजार ५२०, वैभव नागरी पतसंस्था (हातवळण)- १ लाख ७७ हजार ७००, मानव आधार प्रतिष्ठान (मठपिंप्री) ४१ हजार २७५, वैभव नागरी पतसंस्था (तांदळी वडगाव) १७ हजार ६४५, गुणवाडी सेवा सोसायटी- १२ हजार ४०, यशांजली ग्रामीण बिगरशेती पतसंस्था (घोसपुरी) १ लाख ३४ हजार ६४५, सारोळा कासार सोसायटी -३ लाख ३४ हजार ५३०, पद्मावती बहुउद्देशीय संस्था (घोसपुरी) ५५ हजार १५०, कानिफनाथ मजूर सहकारी पतसंस्था (निमगाव वाघा) १ लाख ११ हजार ९९०, चास सेवा सोसायटी - ८ हजार ८७०, विशाल सहकारी दूध उत्पादक संस्था (सारोळा कासार) १ लाख १० हजार ७९०. एकूण - १४ लाख १० हजार २१०.
दरम्यान, जिल्हा प्रशासनाने यापूर्वी १२४ छावणीचालकांना ३० लाख २१ हजार रूपयांचा दंड केला आहे. त्यामुळे आतापर्यंत एकूण १३६ छावण्यांना ४४ लाख ३७ हजार ५६० रूपयांची दंडात्मक कारवाई झालेली आहे.

Web Title: Violation of terms and conditions: 136 civic punishment for 44 lacs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.