कोपरगावात दोन गटात तुंबळ हाणामारी; तेरा जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 11:29 AM2020-06-22T11:29:54+5:302020-06-22T11:30:03+5:30

कोपरगाव (जि. अहमदनगर) : मागील भांडणाच्या कारणावरुन रविवारी सायंकाळी दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. लाकडी दांडा, दगड, वीट तसेच लाथाबुक्क्याने एकमेकांस मारहाण करीत शिवीगाळ झाली.

Violent clashes between two groups in Kopargaon; Thirteen people were charged | कोपरगावात दोन गटात तुंबळ हाणामारी; तेरा जणांवर गुन्हा दाखल

कोपरगावात दोन गटात तुंबळ हाणामारी; तेरा जणांवर गुन्हा दाखल

कोपरगाव (जि. अहमदनगर) : मागील भांडणाच्या कारणावरुन रविवारी सायंकाळी दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. लाकडी दांडा, दगड, वीट तसेच लाथाबुक्क्याने एकमेकांस मारहाण करीत शिवीगाळ झाली.

कोपरगाव शहरातील इंदिरापथ, संजयनगर येथे रविवारी ( दि.२१ ) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी दोन्ही गटाने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री सव्वा बारा वाजेच्या सुमारास परस्पर विरोधी फियार्दी दाखल केल्या आहे.

रुपेश कैलास जाधव ( वय २२, रा. इंदिरापथ, संजयनगर, कोपरगाव ) याच्या फिर्यादीवरून योगेश घनश्याम गायकवाड, घनश्याम गोविंद गायकवाड, मंदाबाई घनश्याम गायकवाड, मयुरी योगेश गायकवाड ( सर्व रा. इंदिरापथ, संजयनगर, कोपरगाव ) या चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. तर योगेश घनश्याम गायकवाड ( वय ३२, रा. इंदिरापथ, संजयनगर, कोपरगाव ) याच्या फिर्यादीवरून रुपेश कैलास जाधव, संतोष रामभाऊ चव्हाणके, लक्ष्मण सीताराम चव्हाणके, अभी पुणेकर, दादा बाळासाहेब जाधव, रोहिणी बाळासाहेब जाधव, सरुबाई बापुराव जाधव, शंकर यादव, अभी लक्ष्मण चव्हाणके ( सर्व रा.इंदिरापथ, संजयनगर, कोपरगाव ) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.


दरम्यान या हाणामारीत दोन्ही गटातील या दोन्ही फियार्दीसह बाळासाहेब बापुराव जाधव, सरुबाई बापुराव जाधव, रोहिणी बाळासाहेब जाधव, घनश्याम गोविंद गायकवाड, मंदाबाई घनश्याम गायकवाड सात जण जखमी झाले आहे. त्यांच्यावर कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. गुन्ह्यातील आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: Violent clashes between two groups in Kopargaon; Thirteen people were charged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.