अहमदनगरमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, कर्जतमध्ये वनविभागाचे वाहन पेटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 12:51 PM2018-07-25T12:51:09+5:302018-07-25T13:04:09+5:30

कर्जत शहरातील वनविभागाच्या कार्यालयाच्या आवारात उभे असलेले सरकारी वाहन आंदोलकांनी रस्त्यावर आणून पेटवून दिले.

A violent turn of the movement in Ahmadnagar, a forest department vehicle in Karjat | अहमदनगरमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, कर्जतमध्ये वनविभागाचे वाहन पेटविले

अहमदनगरमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, कर्जतमध्ये वनविभागाचे वाहन पेटविले

अहमदनगर : मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झाले आहे. कर्जत शहरातील वनविभागाच्या कार्यालयाच्या आवारात उभे असलेले सरकारी वाहन आंदोलकांनी रस्त्यावर आणून पेटवून दिले.
अहमदनगर शहरातील एमआडीसीमधील शोरुमवर दगडफेक करण्यात आली. शोरूम बंद न केल्याने नगर - मनमाड रोडवरील सह्याद्री चौकातील कांकरिया शोरुमवर दुचाकी रॅलीतील तरुणांची दगडफेक केली. यामध्ये चारचाकी वाहनांचे नुकसान झाले आहे. शहरातील गांधी मैदानातही किरकोळ दगडफेक करण्यात आली. यामध्ये एकास पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

Web Title: A violent turn of the movement in Ahmadnagar, a forest department vehicle in Karjat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.