विसापूर कारागृह कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:20 AM2021-04-11T04:20:30+5:302021-04-11T04:20:30+5:30
विसापूर- श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथील खुल्या जिल्हा कारागृहातील बहुसंख्य अधिकारी व कर्मचाऱ्यांचा कोरोना लसीकरणाचा पहिला व दुसरा डोस पूर्ण ...
विसापूर- श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथील खुल्या जिल्हा कारागृहातील बहुसंख्य अधिकारी व कर्मचाऱ्यांचा कोरोना लसीकरणाचा पहिला व दुसरा डोस पूर्ण झाला आहे. काही बंदिवानांनाही पहिला डोस देण्यात आला आहे. कोणताही बंदिवान लस घेतल्यापासून वंचित राहाणार नाही, यासाठी प्रयत्न असल्याचे कारागृहाचे अधीक्षक प्रदीप जगताप यांनी सांगितले. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पहिला डोस पूर्ण झाला आहे. बहुसंख्य कर्मचाऱ्यांचा दुसरा डोसही झाला आहे. प्रदीप जगताप यांच्यासह वरिष्ठ तुरुंगाधिकारी प्रकाशसिंग परदेशी, बाळकृष्ण जासूद व राजेंद्र पवार यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासनाच्या आदेशानुसार कारागृहातील बहुसंख्य कैदी पॅरोलवर गेलेले आहेत. कारागृहात सध्या असलेल्या १८ कैद्यांपैकी १० जणांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.