विसापूर जलाशय ओव्हरफ्लो, हंगा नदी काठच्या लोकांना प्रशासनाकडून सावधानतेचा इशारा.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 02:49 PM2020-09-19T14:49:32+5:302020-09-19T14:54:19+5:30
विसापूर- श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर धरण शनिवारी संध्याकाळी ओव्हरफ्लो झाल्याने सांडव्यावरुन पाणी हंगा नदी पात्रत वाहु लागले आहे.महसूल व पोलीस विभागाचे वतीने हंगा नदी काठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
विसापूर- श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर धरण शनिवारी संध्याकाळी ओव्हरफ्लो झाल्याने सांडव्यावरुन पाणी हंगा नदी पात्रत वाहु लागले आहे.महसूल व पोलीस विभागाचे वतीने हंगा नदी काठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
विसापूर जलाशयाचे पाणलोट क्षेत्रात गेल्या आठवड्या पासून चांगला पाऊस झाल्याने सलग दुसऱ्या वर्षी विसापूर जलाशय ओव्हरफ्लो झाला आहे.विसापूर या वर्षी ही ओव्हरफ्लो झाल्याने विसापूर लाभक्षेत्रातील बेलवंडी,चिंभळा,लोणी व्यंकनाथ,शिरसगाव बोडखा व बाबुर्डी येथील शेतकऱ्यांना पाण्यासाठी नेहमी प्रमाणे संघर्ष करावा लागणार नाही.विसापूर जलाशयाची पाणी साठवण क्षमता ९०४ दशलक्ष घनफूट एवढी आहे.
विसापूर जलाशयात १९४ दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक होते.त्यामध्ये कुकडी कालव्याचे ३०० दशलक्ष घनफूट सोडण्यात आले होते.गेल्या आठवड्यात हंगा नदीतून ४१० दशलक्ष घनफूट आवक होऊन जलाशय शंंभर टक्के भरला आहे.हंगा नदीसह विसापूर जलाशयत येेेणाऱ्या ओढ्या नाल्यातुन पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात चालू असल्याने विसापूर खाली हंंगा नदीला पुुर येण्याची शक्यता आहे.त्यामुळे महसूल व पोलीस प्रशासनाने हंगा नदी काठच्या पिंपळगाव पिसा,खरातवाडी,बेलवंडी,येळपणे,पिसोरे व हंगेवाडी अदी गावातील नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.कोणत्याही नागरिकाने पाण्याच्या प्रवाहात जाण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन करण्यात आले आहे.