२७ देशातील भाविकांचे विश्वव्रिकमी महापारायण,पाच लाखाहून अधिक भाविकांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 06:46 PM2020-06-13T18:46:57+5:302020-06-13T18:48:19+5:30
शिर्डी: कोरोनाचा नायनाट व्हावा, योध्द्यांना बळ मिळण्यासाठी साईनिर्माणच्या वतीने महिनाभरापासून सुरु असलेल्या घर तेथे साईचरित्र या उपक्रमात २७ देशातील पाच लाखाहून अधिक भाविकांनी सहभाग घेतला. गुरुवारी विश्वव्रिकमी महापारायण केले.
शिर्डी: कोरोनाचा नायनाट व्हावा, योध्द्यांना बळ मिळण्यासाठी साईनिर्माणच्या वतीने महिनाभरापासून सुरु असलेल्या घर तेथे साईचरित्र या उपक्रमात २७ देशातील पाच लाखाहून अधिक भाविकांनी सहभाग घेतला. गुरुवारी विश्वव्रिकमी महापारायण केले.
जगात कोरोनाच्या संकटाने कहर केला आहे. प्रशासन कोरोनाची साखळी तोडण्यासाठी विविध उपाययोजना करत आहे. मात्र तरीही कोरोना संकट गडद होत चालले आहे. कोरोना लढाई जिंकण्यासाठी डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस प्रशासन, स्वच्छता कर्मचारी हे कोरोना योध्दे रात्रंदिवस परिश्रम घेत आहेत. औषध शोधण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. विज्ञानाला आध्यात्माची जोड देत या उपक्रमात भाविकांनी सहभागी व्हावे असे आवाहन सोशल मीडियाद्वारे करण्यात आले होते. पहिल्या गुरुवारी शिर्डी, त्यानंतर राहाता तालुका, नगर जिल्हा, महाराष्ट्र व भारतासह संपूर्ण जगात भाविकांना घरोघरी पारायण करण्याचे आवाहन करण्यात आले. सोशल मीडियाद्वारे देश विदेशातील भाविक, शिर्डीत येणारे पदयात्री, गावोगावी केलेल्या पारायण सोहळ्याची भाविक यांच्याशी संपर्क साधला. अमेरिका, युनायटेड किंग्डम, कॅनडा, आॅस्ट्रेलिया, न्युझीलंड, जपान, थायलंड, मलेशिया, केनिया, तांजाविया, युगांडा, श्रीलंका, नेपाल, आखाती राष्ट्रे, ओमान, कतार, जर्मनी, तैवान, बार्बाडोस, मॉरिशस, फिजी, इंडोनेशिया, सिंगापुर यासह एकूण 27 देशातील भाविकांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला. पाच लाखाहून अधिक भाविकांनी विश्वविक्रमी महापारायण करत कोरोना संकट निवारणासाठी साईबाबांना साकडे घालत कोरोना योध्दांना उत्तम आरोग्य लाभावे. त्यांना काम करण्यासाठी बळ प्राप्त व्हावे यासाठी सर्वांनी प्रार्थना केली. साईनिर्माणचे विजयराव कोते, प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते, पंकज लोढा यांनी हा उपक्रम राबविला.
------------
कोरोना संकट नष्ट होऊन संपूर्ण जगात विश्वशांती नांदावे. कोरोना योध्द्यांचे आत्मबल वाढावे. यासाठी राबविण्यात आलेल्या घरोघरी साईचरित्र पारायण उपक्रमास भरभरुन भाविकांचा प्रतिसाद मिळाला. जगातील पाच लाखाहून अधिक भाविकांनी यात स्वयंस्फुर्तीने सहभाग नोंदवला .
-विजय कोते, अध्यक्ष साईनिर्माण
---
घरोघरी साईचरित्र पारायण उपक्रमास मोठा प्रतिसाद मिळाला. संपुर्ण जगातील भाविकांनी यात सहभाग घेत महापारायण केले.
-पंकज लोढा, अध्यक्ष, साईसंदेश ग्रुप.