आफ्रिकन शिष्टमंडळाची हिवरेबाजारला भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 07:52 PM2018-02-26T19:52:02+5:302018-02-26T19:56:54+5:30
दक्षिण आफ्रिकेतही अनेक खेड्यांना दुष्काळाला तोंड द्यावे लागते म्हणून हिवरेबाजारचे काम आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. हिवरेबाजारच्या धर्तीवर आम्ही आमच्या देशात काम करू, असे मत दक्षिण आफ्रिकेच्या शिष्टमंडळाने सोमवारी हिवरेबाजार येथे भेटीप्रसंगी व्यक्त केले.
केडगाव : आम्ही जगातील अनेक देशातील खेड्यांना भेटी दिल्या. परंतु दुष्काळी गावाने भगीरथ प्रयत्न करून आपले गाव स्वच्छ सुंदर, निसर्गरम्य व जलसमृद्ध बनविले असे गाव आम्हाला प्रथमच पहावयास मिळत आहे. आमच्या दक्षिण आफ्रिकेतही अनेक खेड्यांना दुष्काळाला तोंड द्यावे लागते म्हणून हिवरेबाजारचे काम आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. हिवरेबाजारच्या धर्तीवर आम्ही आमच्या देशात काम करू, असे मत दक्षिण आफ्रिकेच्या शिष्टमंडळाने सोमवारी हिवरेबाजार येथे भेटीप्रसंगी व्यक्त केले.
या शिष्टमंडळात दक्षिण आफ्रिकेतील इल्वाद सेडीग (सुदान), अब्दुल्ला गारो (सुदान),मोहंमद स्याडवी (इजिप्त), मोहंमद मॅरी मोहंमद (इजिप्त), विजीर्नीया चीसले (मालावी), अमिना बुकोला (नाजेरिया), फुमेलीया एलिजाबेथ (नायजेरिया), आॅजेडॅन तमिलाडे (नाजेरिया), ओग्निफेरो डॅनियल यांचा समावेश होता.
इंडो आफ्रिकन प्रशिक्षणांतर्गत आय.सी.ए.आर प्रशिक्षण केंद्र बारामती येथे त्यांचे १५ दिवसांचे प्रशिक्षण सुरु आहे. त्याचा एक भाग म्हणून हिवरेबाजारच्या विकासाच्या अभ्यासासाठी त्यांनी भेट दिली. पोपटराव पवार यांनी शिष्टमंडळाचे स्वागत करुन हिवरेबाजारच्या विकासाचे दर्शन घडविले. सदर भेटीदरम्यान बारामती प्रशिक्षण केंद्राचे महेश कुमार व योगेश्वर सिंग हेही उपस्थित होते.