सुरत-चेन्नई राष्ट्रीय महामार्ग नगरमधून जाणार. वाघोली-शिरूरला होणार थ्री लेअर ब्रीज. नितीन गडकरी यांची घोषणा.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2021 12:55 PM2021-10-02T12:55:41+5:302021-10-02T13:01:21+5:30
अहमदनगर : सुरत- चेन्नई हा राष्ट्रीय महामार्ग नगरमधून जाणार असल्याने अहमदनगर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होणार आहे. फक्त या रस्त्यासाठी गौण खनिजासाठी रॉयल्टी महाराष्ट्र सरकारने माफ करावी. त्यासाठी लवकरच महाराष्ट्र सरकारसोबत बैठक होणार आहे. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाघोली-शिरूर या मार्गावर थ्री लेअर (तीन मजली) पूल-रस्ता करण्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली.

आठ महामार्गांचे लोकार्पण व भूमिपूजन प्रसंगी अहमदनगर येथे त्यांनी ही घोषणा केली. यासोबतच औरंगाबाद-अहमदनगर आणि तळेगाव-चाकणही उड्डाणपुलाने जोडण्याची घोषणा केली. कोपरगाव-सावळी विहिरी, तळेगाव-चाकण-श्रीगोंदा-पाटोदा, जामखेड-सौताडा या नवीन मार्गांचीही गडकरी यांनी घोषणा केली. यामुळे नगरच्या विकासात मोठी भर पडणार आहे.
अहमदनगरच्या उड्डाणपुलाची लांबी वाढविण्याबाबत बांधकाम खात्याची चर्चा करून निर्णय घेतला जाईल, अशीही ग्वाही त्यांनी दिली. याशिवाय सुरत-सोलापूर या नव्या राष्ट्रीय महामार्गाची घोषणाही गडकरी यांनी केली.