आरोग्यसेवेत परिचारिकांचा मोलाचा वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:22 AM2021-05-13T04:22:02+5:302021-05-13T04:22:02+5:30

दहिगावने : सध्या कोरोना महामारीचा सामना करताना राज्याचे आरोग्य विभागाचे कर्मचारी जीव धोक्यात घालून रुग्णांना आरोग्यसेवा देत आहेत. ते ...

The wait for nurses in healthcare | आरोग्यसेवेत परिचारिकांचा मोलाचा वाट

आरोग्यसेवेत परिचारिकांचा मोलाचा वाट

दहिगावने : सध्या कोरोना महामारीचा सामना करताना राज्याचे आरोग्य विभागाचे कर्मचारी जीव धोक्यात घालून रुग्णांना आरोग्यसेवा देत आहेत. ते देत असलेले योगदान अतुलनीय असून आरोग्य परिचारिकांचा त्यात मोलाचा वाटा असल्याचे प्रतिपादन दहिगावने प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कैलास कानडे यांनी केले.

शेवगाव तालुक्यातील दहिगावने प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या चौदा गावांच्या ‘गाव तेथे लसीकरण’ मोहिमेचा प्रारंभ बुधवारी भावीनिमगाव येथून करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी जागतिक परिचारिका दिनाचे औचित्य साधून मागील सलग चौदा महिन्यांपासून कोरोना बाधित रुग्णांची सेवा करणाऱ्या परिचारिकांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच आबासाहेब काळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

यावेळी पंचायत समितीचे कृषी विस्ताराधिकारी रामकिसन जाधव, ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत जोशी, ग्रामपंचायत सदस्य संतोष शेळके, निलेश कुंभकर्ण, प्रवीण मरकड, गंगाधर पाबळे, संदीप शेळके, प्रा. संतोष आडकित्ते, परिचारिका अंजली इंगळे, निर्मला बनसोडे, वर्षा सोनवणे, लगडे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. गायकवाड, डॉ. गव्हाणे, डॉ. बडे, डॉ. थोरात यांच्यासह आरोग्य विभागाचे कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

---

१२ भावीनिमगाव

भावीनिमगाव ग्रामपंचायतीच्या वतीने परिचारिकांचा सन्मान केला.

Web Title: The wait for nurses in healthcare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.