शेवगाव तालुक्यातील तेरा गावांना बोंडअळीच्या अनुदानाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 06:13 PM2018-09-27T18:13:48+5:302018-09-27T18:14:04+5:30

बोंडअळीमुळे गेल्यावर्षी कपाशीचे नुकसान झालेल्या शेवगाव तालुक्यातील १३ गावांमधील शेतकरी सरकारी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत.

Waiting for bollwind grant to Tera villages of Shevgaon taluka | शेवगाव तालुक्यातील तेरा गावांना बोंडअळीच्या अनुदानाची प्रतीक्षा

शेवगाव तालुक्यातील तेरा गावांना बोंडअळीच्या अनुदानाची प्रतीक्षा

बालमटाकळी : बोंडअळीमुळे गेल्यावर्षी कपाशीचे नुकसान झालेल्या शेवगाव तालुक्यातील १३ गावांमधील शेतकरी सरकारी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. तालुक्यातील बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३३ कोटी रूपये मंजूर झाले आहेत.
गेल्यावषी बोंडे येण्याच्या वेळी कपाशी पिकावर अचानकपणे बोंडअळीच्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेवगाव तालुक्यातील शेतकºयांच्या कपाशी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे या भागातील कपाशी पिकाचे तलाठी, ग्रामसेवक, कृषी विभाग यांच्या संयुक्त पथकामार्फत पंचनामे करण्यात आले. त्यानुसार शेतकºयांना बोंडअळीचे अनुदान मिळण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आल्यानंतर शेवगाव तालुक्यासाठी ३३ कोटी रूपये अनुदान मंजूर झाले. या मंजूर रकमेचे ३ टप्प्यात वाटप होणार असे जाहीर करण्यात आले होते. तालुक्यातील एकूण ११३ गावांपैकी पहिल्या टप्प्यात ५३ गावांसाठी ८ कोटी ७५ लाख रूपयांचे बोंडअळी अनुदान तहसीलमार्फत वाटप करण्यात आले. दुसºया टप्प्यामध्ये ५२ गावांमधील शेतकºयांना १३ कोटी १२ लाखाचे अनुदान वाटप करण्यात आले. आता तिसºया टप्प्यासाठी १३ गावातील शेतकºयांना सरकारकडून अनुदान प्राप्त होताच ते शेतकºयांना वाटप करण्यात येईल, अशी माहिती नायब तहसीलदार मयूर बेरड यांनी दिली आहे.
‘‘तालुक्यातील ११३ गावांपैकी १०५ गावांना पहिल्या व दुसºया टप्प्यांमध्ये २१ कोटी ९५ लाख रूपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे. उर्वरित कांबी, राणेगाव, कोनोशी, शोभानगर, शिंगोरी, नागलवाडी, गोळेगाव, शेकटे खुर्द, एरंडगाव, लाखेफळ, खामगाव, जोहरापूर, हिंगणगाव ने या १३ गावांना तिसºया टप्प्यात वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी ६ कोटी ७५ लाख रूपयांची तहसील कार्यालयाकडून वरिष्ठांकडे मागणी करण्यात आली आल्याचे नायक तहसीलदार मयूर बेरड यांनी सांगितले.

 

Web Title: Waiting for bollwind grant to Tera villages of Shevgaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.