कुकडीच्या आवर्तन नियोजनाची प्रतीक्षा

By | Published: December 5, 2020 04:40 AM2020-12-05T04:40:46+5:302020-12-05T04:40:46+5:30

श्रीगोंदा : कुकडी प्रकल्पात यावर्षी २२ हजार ३४ एमसीएफटी (२२ टीएमसी, ७४ टक्के) पाणीसाठा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ...

Waiting for the chicken to rotate | कुकडीच्या आवर्तन नियोजनाची प्रतीक्षा

कुकडीच्या आवर्तन नियोजनाची प्रतीक्षा

श्रीगोंदा : कुकडी प्रकल्पात यावर्षी २२ हजार ३४ एमसीएफटी (२२ टीएमसी, ७४ टक्के) पाणीसाठा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल पाच टीएमसी (२१ टक्के) कमी पाणीसाठा आहे. त्यामुळे कुकडी कालवा सल्लागार समितीची बैठक कधी होणार आणि किती आवर्तने शेती व पिण्याच्या पाण्यासाठी सोडली जाणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

गेल्या वर्षी कुकडी प्रकल्पात २८ हजार ४८ एमसीएफटी (९५ टक्के) उपयुक्त पाणीसाठा होता. अशा परिस्थितीत शेतीसाठी तीन आवर्तने सोडण्याचा निर्णय कुकडी कालवा सल्लागार समीतीच्या पहिल्या बैठकीत घेण्यात आला. मात्र, प्रत्यक्षात शेतीसाठी दोन व एक पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडण्यात आले होते. यंदा कुकडी प्रकल्पातील येडगाव धरणात २ हजार ३८२ एमसीएफटी ९७ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे, तर माणिकडोह ४ हजार ७५० एमसीएफटी ४७ टक्के, वडज १ हजार १६४ एमसीएफटी ९९ टक्के, डिंभे १२ हजार ३५६ एमसीएफटी ९९ टक्के, पिंपळगाव जोगे धरणात १ हजार ८८७ एमसीएफटी ४८ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. घोड धरणात ४ हजार ८७७ एमसीएफटी १०० टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.

यावर्षी माणिकडोह, पिंपळगाव जोगे ही धरणे निम्मीच भरली आहेत. हा चिंतेचा विषय आहे. याचा कुकडीच्या एका आवर्तनावर परिणाम होणार आहे; परंतु सीना, विसापूर धरणे १०० टक्के भरली ही जमेची बाजू आहेत.

कुकडी लाभक्षेत्रातील ज्वारी पाण्याअभावी सुकू लागली आहेत. मात्र, कुकडी कालवा सल्लागार समितीची बैठक घेण्यावर अद्याप कोणतीच चर्चा नाही. त्यामुळे ही बैठक तातडीने घेऊन कुकडीची आवर्तनांसंदर्भात एकत्रित निर्णय होईल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.

कोट...

कधी होणार बैठक...

कुकडी लाभक्षेत्रातील पूर्व भागात ज्वारी, कांदा, सूर्यफुल पिके आहेत. या पिकांना पाण्याची आवश्यकता असून, कुकडी कालवा सल्लागार समितीची बैठक लवकर घेऊन आवर्तन सोडण्याबाबत लोकप्रतिनिधी, अधिकारी यांनी निर्णय घ्यावा, असे आवाहन आढळगाव येथील शरद जमदाडे यांनी केले.

कोट..

यंदा पाऊस चांगला झाला. आवर्तन सोडा म्हणून कोणीही मागणी केलेली नाही. मात्र, आम्ही कालवा सल्लागार समितीची बैठक घ्यावी लागेल याबाबत प्रस्ताव पाठवला आहे. त्यामुळे लवकरच बैठक होईल. त्यामध्ये आवर्तनाचे नियोजन ठरेल.

-हेमंत धुमाळ,

अधीक्षक अभियंता, कुकडी प्रकल्प, पुणे

Web Title: Waiting for the chicken to rotate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.