वाकडी-श्रीरामपूर रस्ता झाला जीवघेणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:08 AM2021-08-02T04:08:51+5:302021-08-02T04:08:51+5:30
वाकडी मार्गे जाणार हा शिर्डी-शिंगणापूर रस्ता कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे. साई संस्थानने हा रस्ता मध्यंतरी मजबुतीकरणासाठी आराखड्यात घेतला होता. ...
वाकडी मार्गे जाणार हा शिर्डी-शिंगणापूर रस्ता कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे. साई संस्थानने हा रस्ता मध्यंतरी मजबुतीकरणासाठी आराखड्यात घेतला होता. परंतु पुढे काही कारणास्तव हा रस्ता प्रलंबित राहिला. जिल्हा परिषदेकडून सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे हा रस्ता मजबूत होणेसाठी वर्ग होणे कामी अनेक वेळा अर्ज व प्रस्तावदेखील सादर झाले. मात्र अद्यापही हा प्रश्न लटकलेलाच दिसून येत आहे. रोज या रस्त्यावरून शेकडो दुचाकी व चारचाकी वाहनांची वर्दळ असते. मध्यंतरी या रस्त्यावर लाखो रुपये खर्च करून तात्पुरती डागडुजी केली गेली. मात्र निकृष्ट कामामुळे हा रस्ता पुन्हा खड्डेमय झाला आहे. रस्त्यावर वाकडी येथील खंडेराय देवस्थान मंदिर असून खराब रस्त्यामुळे भाविकांमध्ये नाराजी पसरत आहे. हा रस्ता त्वरित दुरुस्त न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा वाकडी ग्रामस्थांनी दिला आहे.
०१ वाकडी