वांबोरी चारीला पुन्हा पाणी सोडले; सहा दिवस चालणार आवर्तन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 14:35 IST2020-04-17T14:35:21+5:302020-04-17T14:35:57+5:30
मुळा धरणाचा पाणीसाठा खालवत आहे. बंद पडलेल्या वांबोरी चारीचे आवर्तन पुन्हा सुरू झाले आहे. चारीची दुरुस्ती झाली असली तरी आणखी सहा दिवस आवर्तन सुरू राहणार आहे.

वांबोरी चारीला पुन्हा पाणी सोडले; सहा दिवस चालणार आवर्तन
राहुरी : मुळा धरणाचा पाणीसाठा खालवत आहे. बंद पडलेल्या वांबोरी चारीचे आवर्तन पुन्हा सुरू झाले आहे. चारीची दुरुस्ती झाली असली तरी आणखी सहा दिवस आवर्तन सुरू राहणार आहे. सहा दिवसानंतर मुळा धरणाचा पाणीसाठा १४ हजार ५०० दशलक्ष घनफूट होणार आहे. पाईप उघडे पडल्यानंतर वांबोरी चारीचे पाणी बंद होणार आहे.
२६ हजार दशलक्ष घनफूट पाणीसाठा क्षमता असलेल्या मुळा धरणात सध्या १५ हजार १९५ दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. वांबोरी चारीचे वीज बील एक कोटी ९० लाख थकीत आहे. ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या विशेष प्रयत्नातून सोमवारपासून वांबोरी पाईप जलवाहिनीतून पाणी सोडण्यात आले आहे. मात्र जलवाहिनीला गळती लागल्याने आवर्तन बंद झाले होते. रात्रंदिवस प्रयत्न करून जलवाहिनीचे लिकेज काढण्यात आले आहे. डमाळवाडी, खोसपुरी या दोन ठिकाणी लिकेज काढण्यात यश आले आहे. त्यामुळे पुढील फक्त सहा दिवस मुळा धरणातून आवर्तन सुरू राहणार आहे. दुसºया टप्प्यात तीन तळे भरले. सध्या भोसे, खांडगाव उद्या सकाळी सातवड याठिकाणी पाणी पोहोचेल.