आरक्षणासाठी जामखेडमध्ये वंजारी समाजाचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2019 03:43 PM2019-09-07T15:43:48+5:302019-09-07T15:44:41+5:30
राज्यातील वंजारी समाजाची संख्या १३ टक्के आहे. आरक्षण मात्र २ टक्के आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे आता आरक्षणात वाढ करुन १० टक्के करावे, या इतर विविध मागण्यांसाठी शनिवारी सकाळी ११ वाजता जामखेडमध्ये वंजारी आरक्षण कृती समितीच्या वतीने तहसीलवर मोर्चा काढण्यात आला होता.
जामखेड : राज्यातील वंजारी समाजाची संख्या १३ टक्के आहे. आरक्षण मात्र २ टक्के आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे आता आरक्षणात वाढ करुन १० टक्के करावे, या इतर विविध मागण्यांसाठी शनिवारी सकाळी ११ वाजता जामखेडमध्ये वंजारी आरक्षण कृती समितीच्या वतीने तहसीलवर मोर्चा काढण्यात आला होता. आरक्षण न दिल्यास विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा यावेळी वंजारी समाजाच्या वतीने देण्यात आला.
मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने समाजबांधव, महिला सहभागी झाले होते. यावेळी मोर्चेकºयांच्या हातात आरक्षणाचे फलक घेतले होते. त्यावर एकच मिशन वंजारी आरक्षण, आरक्षण आमचे हक्काचे नाही कोणाच्या बापाचे, एकच चर्चा वंजारी मोर्चा.. अशा घोषणा देत तहसील कार्यालयावर धडकला. आरक्षण कृती समाजाचे नेते सभेत बसलेले होते. तर व्यासपीठावर मार्गदर्शन करणाºया मुली उपस्थित होत्या.
यावेळी सुजाता मुंढे, संस्कृती ठोंबरे, श्रेयस राख, वनश्री मिसाळ, पूनम गोपाळघरे, प्रतीक्षा गिते, नीता दराडे, सुनीता बोडखे, सोनाली वनवे, अविद्या घुले यांनी तडाखेबंद भाषणे केली. राज्यात वंजारी समाजाची ९५ लाखांवर लोकसंख्या असल्याची नोंद आहे. सरकारने जनगणना करुन वंजारी समाजाची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन वाढीव आरक्षण द्यावे, केवळ दोन टक्के आरक्षण असल्याने गुणवत्ता असूनही विद्यार्थ्यांची एमपीएससी, युपीएससी नोकरी मिळत नाही. त्यामुळे १० टक्के आरक्षण मिळावे, अशी समाजबांधवांची गेल्या अनेक वषार्पासूनची मागणी आहे.
यावेळी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना देण्यात आले. हा मोर्चा समाजाच्या हिताचा असून कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही अथवा कोणाच्याही विरोधात नाही. समाजातील नेते हे बहुजनांचे नेतृत्व करीत आहेत. ते सध्या वंजारी समाजाच्या आरक्षणाबाबत बोलत नसले तरी मोर्चा पाहून ते स्वत:ही लढ्यात सहभागी होतील व सरकार आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावेल, असा विश्वास समितीने व्यक्त केला.
या मोचार्ला सकल मराठा समाज, राष्ट्रवादी काँग्रेस, युवक काँग्रेस, जामखेड नगरपरिषद, पंचायत समिती, बाजार समिती, भाजप, घिसाडी समाज, शिवप्रतिष्ठान हिंदूस्थान आदी संघटनांनी पाठिंबा दिला.