७० हजारांची लाच घेताना वनाधिकारी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 03:38 PM2019-07-18T15:38:30+5:302019-07-18T15:39:39+5:30
गॅस एजन्सीचालकाकडून ७० हजार रुपयांची लाच घेताना रेहकुरी(ता़ कर्जत) अभयारण्यातील वन परिक्षेत्र अधिकाऱ्याला बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली़
अहमदनगर: गॅस एजन्सीचालकाकडून ७० हजार रुपयांची लाच घेताना रेहकुरी(ता़ कर्जत) अभयारण्यातील वन परिक्षेत्र अधिकाऱ्याला बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली़ शंकरराव ऋषिकेश पाटील (वय ४२) असे अटक केलेल्या अधिकाºयाचे नाव आहे़ तक्रारदार यांची गॅस एजन्सी आहे़ शासकीय योजनेंतर्गत एजन्सीचालकाने वन विभाग क्षेत्रालगच्या रहिवाशांना २३३ गॅस कनेक्शन दिले होते़ याचा मोबदला म्हणून एजन्सीचालकाला शासनाकडून धनादेश मिळाला होता़ या मिळालेल्या रकमेतून पाटील याने तक्रारदाराकडे ८१ हजार रुपयांची मागणी करून तडजोडीअंती ७० हजार रुपये देण्याचे ठरले होते़ याबाबत एजन्सीचालकाने येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती़ त्यानुसार केलेल्या सापळा कारवाईत पाटील याला पैसे घेताना रंगेहात अटक करण्यात आली़ पोलीस उपाधीक्षक हरिष खेडकर, निरीक्षक शाम पवरे, दीपक करांडे, हेड कॉन्स्टेबल तनवीर शेख, सतीश जोशी, प्रशांत जाधव, रमेश चौधरी, राधा खेमनर, अशोक रक्ताटे यांच्या पथकाने ही कारवाई केली़