नदीकाठच्या गावांना इशारा
By Admin | Published: September 10, 2014 11:33 PM2014-09-10T23:33:57+5:302023-10-27T17:01:57+5:30
अहमदनगर : जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील नदीकाठी वसलेल्या पूर प्रवणक्षेत्रातील गावांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला
अहमदनगर : जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील नदीकाठी वसलेल्या पूर प्रवणक्षेत्रातील गावांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे़ नाशिक व पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने गोदावरी, मुळा, प्रवरा आणि भीमा नदीला पूर येण्याची शक्यता आहे़ त्यामुळे नदी काठच्या गावांना धोका निर्माण होण्याची शक्यता असून, तहसीलदारांना सतर्क राहण्याचे आदेश जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी बुधवारी बजावले आहेत़
जम्मू-काश्मीर येथे झालेल्या अतिवृष्टीने नद्यांना पूर आला आहे़ अनेक शहरे पाण्याखाली गेली आहेत़ सुमारे ४ लाख नागरिक पुरात अडकले असल्याचा प्रशासनाचा अंदाज आहे़ येत्या दोन दिवसांत महाराष्ट्रासह गोवा आणि गुजरातमध्येदेखील अतिवृष्टी होईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे़
(प्रतिनिधी)