श्रीगोंद्यातील वाळू, मुरूम तस्करांना अटक वॉरंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 04:40 PM2018-03-31T16:40:34+5:302018-03-31T16:40:57+5:30

श्रीगोंदा तालुक्यात बेकायदा गौणखनिज उत्खनन वाहतूक व साठा केल्याप्रकरणी २४ जणांच्या विरोधात १ कोटी ५ लाखांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.

Warrant for arrest of sand in Shrigonda, Murom smugglers | श्रीगोंद्यातील वाळू, मुरूम तस्करांना अटक वॉरंट

श्रीगोंद्यातील वाळू, मुरूम तस्करांना अटक वॉरंट

श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यात बेकायदा गौणखनिज उत्खनन वाहतूक व साठा केल्याप्रकरणी २४ जणांच्या विरोधात १ कोटी ५ लाखांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. दरम्यान, हा दंड न भरल्याने या सर्वांना अटक वॉरंट बजवावे, असा आदेश प्रांताधिकारी गोविंद दानेज यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाजीराव पोवार यांना दिला आहे.
वाळू व माती तस्कारांनी लाखो रुपयांच्या माती व वाळूचा उपसा केला. याप्रकरणी २४ जणांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली. या तस्करांनी दंड न भरल्याने दंडात्मक रकमेचा बोजा सात बारा उताऱ्यावर चढविण्यात आला. त्यास तस्करांनी दाद न दिल्याने त्यांना अटक वॉरंट बजावण्याचे आदेश देण्यात आले.
वॉरंट बजावणारांमध्ये प्रशांत नलगे, आदिनाथ मदने, अजय मदने, विठ्ठलराव मोरे, लक्ष्मण जगताप, देविदास काकडे, पंढरीनाथ पासलकर, भानुदास मोरे (सर्व रा. सांगवी दुमाला), मच्छिंद्र सुपेकर (श्रीगोंदा), संभाजी वागस्कर, पोपट रुपनर (सुरोडी), दादा गोला (आर्वी), संजय गिरमकर, मच्छिंद्र जगताप, रंगनाथ गिरमकर, किरण पवार (सर्व रा. अजनूज), प्रकाश कन्हेरकर, चंद्रकांत कन्हेरकर, सुरेश बोरूडे, संभाजी खेंडके, नंदू काळे (सर्व रा.मांडवगण), प्रकाश जगताप, विनोद जगताप, नितीन पठारे (रा.बनपिंप्री) यांचा समावेश आहे. यामध्ये सर्वात कमी प्रकाश नलगे यांना ३ हजार १०० तर सर्वात जादा दंड पंढरीनाथ पासलकर यांना ६२ लाख इतका झाला आहे.


वाळू तस्करांनी शासनाने केलेली दंडात्मक रक्कम न भरल्याने त्यांच्यावर प्रांताधिकारी गोविंद दानेज यांच्या आदेशानुसार अटक वॉरंट बजावण्यात आले. पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्याकडे पुढील कारवाईसाठी पाठविण्यात आले आहे.
-महेंद्र महाजन, तहसीलदार, श्रीगोंदा

Web Title: Warrant for arrest of sand in Shrigonda, Murom smugglers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.