भाजपच्या मागणीला विरोध म्हणून मंदिर उघडणे लांबले होते का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:23 AM2021-09-26T04:23:13+5:302021-09-26T04:23:13+5:30
विखे म्हणाले, महाविकास आघाडी सरकारचा सावळा गोंधळ रोजच सुरू आहे. त्याचे परिणाम विद्यार्थ्यांना भोगावे लागत आहेत. महाविकास आघाडी सरकार ...
विखे म्हणाले, महाविकास आघाडी सरकारचा सावळा गोंधळ रोजच सुरू आहे. त्याचे परिणाम विद्यार्थ्यांना भोगावे लागत आहेत. महाविकास आघाडी सरकार सगळ्याच परीक्षेत नापास झाले आहे. सरकारच्या अनिश्चिततेचा परिणाम जनतेला भोगावा लागत आहे. इतर राज्यांमध्ये नियमावली करून मंदिरे केव्हाच उघडण्यात आली. तिरुपती देवस्थान, वैष्णोदेवी यांसारखी मोठी देवस्थानेही कोविड नियमांचे पालन करून भाविकांसाठी उघडण्यात आली. आपल्या राज्यात मात्र मंदिर उघडण्यास महाविकास आघाडी सरकारने जाणीवपूर्वक उशीर केला. केवळ भाजपाची मागणी होती म्हणून हा प्रश्न सरकारने व्यक्तिगत केला. राज्यात जिथे तीर्थस्थान आहेत, तिथल्या गावांचे अर्थकारण दोन वर्षांपासून मंदिर बंद झाल्यापासून अडचणीत आले. आत्महत्या सुरू झाल्या याची जाणीव महाविकास आघाडी सरकारने ठेवली नाही.
एकीकडे राज्यातील मॉल सुरू झाले, बियरबार सुरु होते. एसटी बसेसही सुरू झाल्या मग फक्त भाविक मंदिरात गेल्यानेच कोरोना होणार होता का? हा नकारात्मक दृष्टीकोन घेऊन मुख्यमंत्री काम करणार असतील तर राज्याचा विकास करण्याच्या केवळ गप्पा ठरल्या आहेत, जनतेचा त्यांच्यावर भरवसा राहिलेला नाही.