मुळा धरणातून जायकवाडीकडे पाणी झेपावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:25 AM2021-09-15T04:25:19+5:302021-09-15T04:25:19+5:30
मुळा धरणात सध्या चोवीस हजार दशलक्ष घनफूट पाणीसाठ्याची नोंद झाली आहे. धरणाकडे सध्या १२ हजार क्युसेकने पाण्याची आवक सुरू ...
मुळा धरणात सध्या चोवीस हजार दशलक्ष घनफूट पाणीसाठ्याची नोंद झाली आहे. धरणाकडे सध्या १२ हजार क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे. मुळा धरणावरील असलेला भोंगा वाजवल्यानंतर नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर रात्री एक ते चार या दरम्यान मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे धरणाकडे पाण्याची आवक वाढली. हरिश्चंद्रगड परिसरामध्ये शंभर मिलिमीटर पाऊस पडला. त्यामुळे अचानक धरणाकडे पाण्याची आवक वाढली. मुळा धरणांमध्ये चोवीस हजार पाचशे दशलक्ष घनफूट पाणीसाठा कायम ठेवून अतिरिक्त आलेले पाणी नदीपात्रात सोडण्यात येणार आहे.
यावेळी उपकार्यकारी अभियंता अण्णासाहेब आंधळे, प्रकाश अकोलकर, शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र मोरे, पंचायत समिती सदस्य रवींद्र आढाव, कर्मचारी दत्तू पवार, दिलीप कुलकर्णी, आयुब शेख, अण्णा आघाव, रावसाहेब हरिश्चंद्रे, सलीम शेख आदी यावेळी उपस्थित होते.
........
मुळा धरणातून सोडण्यात आलेले पाणी ३६ तासांनंतर जायकवाडीत पोहोचणार आहे. देव नदीतून पाच हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग चालू आहे, तर मुळा धरणातून एक हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग चालू आहे.
- अण्णासाहेब आंधळे,
उप कार्यकारी अभियंता