वन्यप्राण्यांना पाणी, चारा केला उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:21 AM2021-04-04T04:21:03+5:302021-04-04T04:21:03+5:30
गावच्या दक्षिणेला गर्भगिरी पर्वतरांगा आहेत. अनेक प्रजातीच्या वन्यप्राण्यांचा येथे सहवास आहे. त्यात तरस, बिबट्या, ससा, हरीण, मोर, घोरपड यांच्यासह ...
गावच्या दक्षिणेला गर्भगिरी पर्वतरांगा आहेत. अनेक प्रजातीच्या वन्यप्राण्यांचा येथे सहवास आहे. त्यात तरस, बिबट्या, ससा, हरीण, मोर, घोरपड यांच्यासह अनेक प्राणी व पक्षी राहतात. यासह परिसरातील शेळ्या-मेंढ्यांचे कळप चारा व पाण्याच्या शोधात येत असतात. सध्या तीव्र उन्हामुळे डोंगर परिसरातील पाण्याचे स्रोत आटले आहेत. त्यामुळे तहान भागवण्यासाठी शिवभक्त सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने वन्यप्राण्यांसाठी पाण्याची सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने पाणवठ्यावर पाणी टाकण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. परिसरातील नागरिकांनी पुढे येऊन वन्यप्राण्यांचे रक्षण करून निसर्गाचा समतोल राखण्यास मदत करावी, असे आवाहन छत्रपती पुरस्कार विजेते गोरक्षनाथ दुधाडे यांनी केले.
शिर्डी मेजर संदीप पठारे, गोवर्धन पाडळे, कृषी अधिकारी विजय कापसे, मंडल अधिकारी दत्तात्रय गोसावी, पोलीस नाईक सुशांत दिवटे, पोलीस नाईक किरण बनसोडे, विकास गुंजाळ, तात्यासाहेब कांबळे, विनोद सहानी, महेश साळुंखे, मीननाथ व्यवहारे, राम भरसाकळ, सुनील साळुंखे, उद्धव रहाणे उपस्थित होते.