राहुरी तालुक्यात पाणीपातळी खालावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:19 AM2021-04-17T04:19:10+5:302021-04-17T04:19:10+5:30
राहुरी : तालुक्यातील तांभेरे, वडनेर, कनगर, निंभेरे, तुळापूर परिसरात उन्हाळ्याची तीव्रता वाढली आहे. यामुळे विहिरी आणि बोअरवेलची पाणीपातळी ...
राहुरी : तालुक्यातील तांभेरे, वडनेर, कनगर, निंभेरे, तुळापूर परिसरात उन्हाळ्याची तीव्रता वाढली आहे. यामुळे विहिरी आणि बोअरवेलची पाणीपातळी खालावली आहे. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला असून, उभी पिके जळू लागली आहेत.
राहुरी तालुक्यातील पश्चिम भागात तुळापूर, निंभेरे, वडनेर, तांभेरे, कनगर या भागात अद्याप निळवंडे धरणाचे पाणी आलेले नाही. पश्चिम भागात निळवंडीचे पाणी न फिरल्यामुळे विहिरी, बोअरवेलची पाण्याची पातळी खाली गेली आहे. त्यामुळे पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या भागातील गहू, हरभरा या पिकांचे खळे झाले आहेत. चाऱ्यासाठी अल्प प्रमाणात घास व ऊस उपलब्ध आहे. त्यावर जनावरांची उपजीविका सुरु आहे. यंदा मार्च महिन्यापासूनच पाण्याची पातळी खालावत चालली होती. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पाण्याची पातळी आणखी घसरली आहे. त्यामुळे या परिसरात जनावरांबरोबरच पक्ष्यांचीही पाण्यासाठी धडपड सुरू आहे.
....