सीना धरणाची पाणी पातळी खालावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 05:23 PM2020-04-25T17:23:29+5:302020-04-25T17:24:24+5:30

सीना धरणातील पाणी पातळी खालावली असून धरणात मृतसाठा शिल्लक आहे. त्यामुळे धरणावरून पाणी पुरवठा करणाऱ्या योजनाही संकटात आहेत.

The water level of Sina Dam dropped | सीना धरणाची पाणी पातळी खालावली

सीना धरणाची पाणी पातळी खालावली

विनायक चव्हाण
मिरजगाव : सीना धरणातील पाणी पातळी खालावली असून धरणात मृतसाठा शिल्लक आहे. त्यामुळे धरणावरून पाणी पुरवठा करणाऱ्या योजनाही संकटात आहेत.
सीना धरण लाभक्षेत्रात यंदा जेमतेमच पाऊस झाला. याच दरम्यान भोसे खिंडीतून कुकडीचे ओव्हरफ्लोचे पाणी सीनात आल्याने पाणीसाठा ७२ टक्क्यांवर पोहोचला. त्यानंतर पावसाच्या पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात न झाल्याने पाणी पातळी वाढू शकली नाही. २०१७ मध्ये हे धरण ओव्हफ्लो झाले. त्यानंतर हे धरण ओव्हरफ्लो झाले नाही. आज धरणात मृतसाठा इतकेच पाणी शिल्लक असून सध्या मिरजगाव व मांडवगण या पाणी योजना कार्यान्वीत आहेत. टॅँकरसाठी काढलेले सतरा गाव पाणी योजनेचे उद्भव मात्र बंद असले तरी धरण लाभक्षेत्रातील कर्जत व आष्टी तालुक्यातील अनेक गावात पाणी टंचाई भासू लागली.
त्यामुळे येत्या काही दिवसात हे उद्भव टॅँकर भरण्यासाठी सुरू करावे लागतील. धरणात ६७९.८९ दशलक्ष घनफूट एवढा पाणीसाठा असला तरी यामध्ये मृतसाठा ५५२.६७ दशलक्ष घनफूट आहे. धरणात उपयुक्त पाणीसाठा १२२.०२ दशलक्ष घनफूट असला तरी, धरणात १७५ दशलक्ष घनफूट गाळ आहे.
पाणी योजना व धरणावरून शेतीसाठी पाणी उपसा करणाºया शेतीपंपाची संख्याही मोठी असल्याने दररोज तीन दशलक्ष घनफूट पाणी उपसा होत आहे. गेल्यावर्षी याच धरणातून दररोज कर्जत व आष्टी तालुक्यातील ३५५ टॅँकर भरले जात होते.
सध्या परिसरातील विहिरी, बोअरवेलची पाणी पातळी झपाट्याने कमी होत असल्याने अनेक गावात पाणी टंचाई जाणवणार आहे. यासाठी सीना धरणात भोसेखिंडीतून कुकडीचे आवर्तन तातडीने सोडण्याची मागणी होत आहे.

सीना धरणात सध्या मृतसाठाच शिल्लक असून कुकडीच्या सध्याच्या आवर्तनातून सीनाधरणात आवर्तन येणार नाही. -बाजीराव थोरात, उपविभागीय अधिकारी, सीना उपविभाग, मिरजगाव

Web Title: The water level of Sina Dam dropped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.