पाणी समस्या अराजकतेची नांदी ठरणार : पोपटराव पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 05:36 PM2019-02-22T17:36:01+5:302019-02-22T17:36:17+5:30
पारनेर तालुका तसा दुष्काळी तालुका आहे. नेहमी या परिसरात पावसाचे प्रमाण कमी असते. यावर्षी तर परिस्थिती बिकट निर्माण झाली आहे.
टाकळी ढोकेश्वर: पारनेर तालुका तसा दुष्काळी तालुका आहे. नेहमी या परिसरात पावसाचे प्रमाण कमी असते. यावर्षी तर परिस्थिती बिकट निर्माण झाली आहे. भविष्यात पाणी समस्या हीच जागतिक अराजकतेची नांदी ठरणार आहे, असे प्रतिपादन राज्यस्तरीय आदर्श गाव योजना समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी केले.
ढोकेश्वर महाविद्यालय, आम्ही टाकळीकर ग्रुप, विद्यार्थी विकास मंडळाच्या महाविद्यालयात पाणी परिषदेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. माजी आमदार नंदकुमार झावरे अध्यक्षस्थानी होते. अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त सीताराम खिलारी, प्राचार्य डॉ. लक्ष्मण मतकर, टाकळीकर ग्रुपचे संतोष सोनावळे, डॉ. भाऊसाहेब खिलारी, विलासराव गोसावी, ज्ञानदेव कचरे, बबन गोसावी, शिवाजी खिलारी यांच्यासह शेतकरी, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
प्रा. शांता गडगे व प्रा. समीर दळवी यांनी सूत्रसंचालन केले. परिषद यशस्वीतेसाठी डॉ. शिवराम कोरडे, प्रा. दादासाहेब लोखंडे, प्रा. अनिल काळे, डॉ. विजय सुरोशी, प्रा. रोहिणी म्हसे, प्रा. एकनाथ जाधव, प्रा. नामदेव वाल्हेकर, प्रा. शैलजा टिंगरे आदींनी प्रयत्न केले. प्रा. गोकुळ मुंडे यांनी आभार मानले.