वन्यप्राण्यांसाठी पाणवठ्यात सोडले पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:19 AM2021-05-23T04:19:46+5:302021-05-23T04:19:46+5:30
घारगाव : संगमनेर वनपरिक्षेत्राच्या भाग ३मध्ये असलेल्या पिंपळगाव देपा येथील जंगलामधील नैसर्गिक व कृत्रिम पाणवठ्यांमधील पाणी आटले असून, ...
घारगाव : संगमनेर वनपरिक्षेत्राच्या भाग ३मध्ये असलेल्या पिंपळगाव देपा येथील जंगलामधील नैसर्गिक व कृत्रिम पाणवठ्यांमधील पाणी आटले असून, वन्यजीवांना पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये यासाठी वन विभागाने याठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. त्यामुळे या जंगलातील प्राण्यांची पाण्याची चिंता मिटली आहे.
पिंपळगाव देपा येथील जंगलात बिबट्या, हरीण, ससा, माकडे, लांडगे, कोल्हा, मोर यांच्यासह अनेक प्राण्यांचा अधिवास आहे. उन्हाळ्यात जंगलातील पाणीसाठे आटत असल्याने वन्यप्राणी पाण्याच्या शोधात गावाकडे येतात. प्राण्यांचे गावाकडे येणे थांबावे तसेच त्यांना जंगलातच पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी वन विभागाकडून पाणवठे तयार करण्यात आले आहेत. या पाणवठ्यांत वन विभाग दरवर्षी टँकरच्या साहाय्याने पाणी सोडताे. यंदाही संगमनेर वनपरिक्षेत्रांतर्गत टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यामुळे वन्यजीवांना जंगलातच पाणी उपलब्ध होणार आहे. यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी हर्शल पारेकर, वनपाल गणपत मुळे, वनरक्षक बी. बी. फुंदे यांच्यासह मजूर वसंत खरात, लहानू देवके, दिलीप कुडेकर, किरण आगविले हे परिश्रम घेत आहेत.
फोटो आहे
संगमनेर वनपरिक्षेत्रांतर्गत पिंपळगाव देपा येथील जंगलामधील पाणवठ्यात टँकरने पाणी सोडण्यात आले.