जलसंसाधनांच्या प्रतिमानांनी पाणी बचत होऊ शकते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:31 AM2021-02-23T04:31:47+5:302021-02-23T04:31:47+5:30
हवामान अद्यावत शेती व जल व्यवस्थापनाचे आधुनिक कृषी विज्ञान व तंत्रज्ञान केंद्रामार्फत महात्मा फुले कृषी विद्यापीठात जलसंसाधनांचे प्रतिमाने ...
हवामान अद्यावत शेती व जल व्यवस्थापनाचे आधुनिक कृषी विज्ञान व तंत्रज्ञान केंद्रामार्फत महात्मा फुले कृषी विद्यापीठात जलसंसाधनांचे प्रतिमाने या विषयाचे एक आठवड्याचे ऑनलाईन आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणाच्या सांगता समारोप प्रसंगी त्यागी बोलत होते. अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु अशोक ढवण होते. याप्रसंगी अधिष्ठाता अशाेक फरांदे, विस्तार शिक्षण संचालक शरद गडाख, संशोधक सुनील गोरंटीवार, सहसमन्वयक अतुल अत्रे, आयोजक सचिव मुकुंद शिंदे, प्रमोद पोपळे उपस्थित होते.
या ऑनलाईन आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण दरम्यान मुंबई येथील प्रख्यात भारतीय तंत्रज्ञान संस्थेचे प्रा.अल्ढो, वेस्ट इंडिज विद्यापीठाचे हाजी अजमतुल्ला, औरंगाबाद येथील सहकारी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे दत्तात्रय रेगुलवार, वारंगल तेलंगाणा येथील राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेचे मनीष पांडे व लिटन रे, बेळगाव येथील के.एल.इ. अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता राजकुमार रायकर, सुरत येथील सरदार वल्लभभाई राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेचे अलका शर्मा व प्रवीण राठोड या प्रमुख वक्त्यांनी जलसंसाधनांच्या प्रतिमानांच्या विविध विषयावर मार्गदर्शन केले.
या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणात अमेरिका, थायलंड, अफगाणिस्तान, इथोपिया, नामेबिया इ. देशांमधून २५० विद्यार्थी, शास्त्रज्ञ, उद्योगक्षेत्रातील अधिकारी व स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला.