मुळाच्या गेटपर्यंत पाणी

By Admin | Published: August 5, 2014 11:40 PM2014-08-05T23:40:59+5:302014-08-05T23:58:11+5:30

राहुरी : आतापर्यंत मुळा धरणात समाधानकारक पाणीसाठा झाला असून, नवीन आवक सुरूच आहे. धरण आता ५५ टक्के भरले आहे. गेल्या चोवीस तासांत धरणात १ टीएमसी नवीन पाणी आले

Water to the root gate | मुळाच्या गेटपर्यंत पाणी

मुळाच्या गेटपर्यंत पाणी

राहुरी : आतापर्यंत मुळा धरणात समाधानकारक पाणीसाठा झाला असून, नवीन आवक सुरूच आहे. धरण आता ५५ टक्के भरले आहे. गेल्या चोवीस तासांत धरणात १ टीएमसी नवीन पाणी आले. धरणाच्या दरवाजांना पाणी खेटले असून, मंगळवारी सायंकाळपर्यंत १४९१७ दशलक्ष घनफूट साठा झाला.
मंगळवारी सकाळी ६ वाजता मुळा धरणात १४३३९ दलघफू पाण्याची नोंद होऊन १७८७़४० फूट पातळी गाठली़ सायंकाळी १५१०० क्युसेकने आवक सुरू होती़
पाणी पातळी १७९६ फूट व साठा १७७५७ दलघफू झाल्यानंतर पाणी सोडले जाते़ मात्र, यंदा ही पातळी न ओलांडल्याने नदीपात्रात पाणी सोडण्यात आलेले नाही़
(तालुका प्रतिनिधी)
राजूर : भंडारदरा आणि मुळा धरणांच्या पाणलोटात पावसाची संततधार सुरूच असून, सोमवारी रात्री या परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे भंडारदरा धरणातील पाणीसाठा ८० टक्क्यांहून अधिक झाला.
पाणलोटात सोमवारी दिवसरात्र मुसळधार पाऊस कोसळला. भंडारदरा पाणलोटातील रतनवाडी नऊ इंच तर घाटघरला आठ इंच पावसाची नोंद झाली. त्यामुळे धरणातील पाण्याची आवक झपाट्याने झाली.
सायंकाळी संपलेल्या चोवीस तासात एकूण साठ्याच्या तब्बल पाच टक्के नवीन पाणी येत पाणीसाठा ८ हजार ८९१ दलघफू इतका झाला. दिवसभरातील बारा तासात या धरणात २६२ दलघफू नवीन पाणी आले. यातील वीज निर्मितीसाठी ३६ दलघफू पाण्याचा वापर होत २२६ दलघफूने पाण्याच्या साठ्यात वाढ झाली.
भंडारदरा धरणातून वीज निर्मितीसाठी सोडण्यात येत असलेल्या पाण्याबरोबरच कळसूबाईच्या पर्वतरांगातील पाणीही निळवंडे धरणात येत असल्यामुळे निळवंडे धरणाचा पाणीसाठा ३ हजार ७९७ दलघफू इतका झाला.
हरिश्चंद्र गडाच्या पर्वतरांगातही दोन दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे मुळा नदीच्या विसर्गात वाढ झाली. आज मुळेचा विसर्ग १५ हजार ६७६ क्युसेक इतका होता. त्यामुळे मुळा धरणातील पाणीसाठ्यातही वाढ होत आहे.
आढळा खोऱ्यातही समाधानारक पाऊस बरसत असल्यामुळे देवठाणजवळील आढळा धरणातील पाणीसाठ्यातही वाढ होत आहे. सकाळी सहा वाजता या धरणातील पाणीसाठा ४२४ दलघफू झाला होता. (वार्ताहर)
रतनवाडीला २२४ मिमी पाऊस
सकाळी संपलेल्या चोवीस तासात झालेल्या पावसाची नोंद पुढील प्रमाणे- रतनवाडी- २२४ मिमी, घाटघर- २०२ मिमी, पांजरे- ११५ मिमी, भंडारदरा- १०१ मिमी, वाकी- ८० मिमी तर निळवंडे- ५७ मिमी आणि अकोले ५० मिमी.

Web Title: Water to the root gate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.