शिरसगाव येथील पाणी योजना आदर्श

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:17 AM2021-07-17T04:17:31+5:302021-07-17T04:17:31+5:30

मुरकुटे म्हणाले, शहरानंतर तालुक्यात प्रथमच ग्रामीण भागात जलस्वराज्य टप्पा दोन या शासकीय योजनेमधून ग्रामस्थांना पिण्यासाठी फिल्टरचे पाणी मिळणार आहे. ...

The water scheme at Shirasgaon is ideal | शिरसगाव येथील पाणी योजना आदर्श

शिरसगाव येथील पाणी योजना आदर्श

मुरकुटे म्हणाले, शहरानंतर तालुक्यात प्रथमच ग्रामीण भागात जलस्वराज्य टप्पा दोन या शासकीय योजनेमधून ग्रामस्थांना पिण्यासाठी फिल्टरचे पाणी मिळणार आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयालगतच्या जागेमध्ये मोठ्या तलावाचे काम पूर्णत्वास आले आहे. सरपंच आबासाहेब गवारे यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली. त्यानंतर पाण्याचा पुरवठा करण्यासाठी भंडारदराच्या आवर्तनातून तलावात पाणी सोडण्यात आले. तलावाच्या सभोवताली संरक्षक तारेचे कंपाउंड करून फिल्टर योजनेसाठी विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. ग्रामस्थांना मीटर बसवून फिल्टर पाणी उपलब्ध केले जाणार आहे.

याप्रसंगी अशोक साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष सुरेश गलांडे, कोंडीराम उंडे, हिम्मत धुमाळ, रामभाऊ कसार, उद्धव आहेर, प्रफुल्ल पवार, गोरक्षनाथ गवारे, शिवाजी गवारे, बबन गवारे, दत्तात्रय गवारे, भीमराज गवारे, सतीश सुलताने, बाळासाहेब बकाल आदी उपस्थित होते.

---------

फोटो ओळी : शिरसगाव

शिरसगाव येथील साठवण तलावाची पाहणी करताना भानुदास मुरकुटे, सरपंच आबासाहेब गवारे आदी.

-------

Web Title: The water scheme at Shirasgaon is ideal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.