जिल्ह्यात ४११ टँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2019 11:23 AM2019-02-07T11:23:27+5:302019-02-07T11:24:30+5:30

जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत असून गेल्या चार महिन्यांतच टँकरची संख्या चारशेच्या पुढे गेली आहे. हिवाळ्यातच सुमारे सव्वासात लाख लोकांना टँकरने पाणी द्यावे लागत असून अजून उन्हाळ्याचे चार महिने बाकी आहेत.

Water supply to 411 tankers in the district | जिल्ह्यात ४११ टँकरने पाणीपुरवठा

जिल्ह्यात ४११ टँकरने पाणीपुरवठा

अहमदनगर : जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत असून गेल्या चार महिन्यांतच टँकरची संख्या चारशेच्या पुढे गेली आहे. हिवाळ्यातच सुमारे सव्वासात लाख लोकांना टँकरने पाणी द्यावे लागत असून अजून उन्हाळ्याचे चार महिने बाकी आहेत. त्यामुळे यंदा टँकरची संख्या हजारी पार करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
यंदाचा पावसाळा संपूर्ण कोरडा गेला. पावसाने सरासरीही गाठली नाही. त्यामुळे खरिपासह रब्बी हंगामही शेतकऱ्यांच्या हातातून निसटला. सुदैवाने धरणक्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने जिल्ह्यातील धरणांचे साठे बºयापैकी आहेत. आॅक्टोबरपासूनच जिल्ह्यात टंचाईने डोके वर काढल्याने टँकर सुरू करण्यात आले. दरम्यान, जिल्हाधिकाºयांनी धरणांतील पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवत जुलैपर्यंत पुरेल एवढ्या पाण्याचे नियोजन केले. अद्याप हिवाळाच सुरू आहे. एकीकडे आॅक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या चार महिन्यांत जिल्ह्यात पारा निच्चांकी घसरला असला तरी दुसरीकडे टँकरची संख्या भर हिवाळ्यातही वाढतच गेली. आजअखेर जिल्ह्यात ४११ टँकरने ७ लाख १९ हजार ८२२ लोकांना पाणीपुरवठा केला जात आहे.
अजून फेब्रुवारी, मार्च, एप्रिल व मे असे उन्ह्याळ्याचे चार महिने जायचे आहेत. या काळात तीव्र पाणी व चाराटंचाई भेडसावणार असल्याने टँकरची संख्या एक हजारच्या वर जाण्याची दाट शक्यता आहे. गेल्या १७ वर्षांच्या इतिहासात टँकरची संख्या साडेआठशेच्या वर गेलेली नाही. २००३मध्ये ६९९, सन २०१२मध्ये ७०७ व २०१५मध्ये ८२६ टँकरने पाणीपुरवठा करावा लागला होता.
यंदा मात्र उन्हाळा सुरू होण्याआधीच टँकर चारशेच्या पुढे गेले आहेत. त्यामुळे हा आकडा तिप्पट होण्याची दाट आहे.

टँकरच्या आवाजाकडेच डोळे
ग्रामीण भागात टँकर आल्यानंतर लगबगीने पाणी भरणे हेच लोकांचे मुख्य काम सध्या झालेले आहे. शेतात काडीचेही काम नाही अन् गावातील विहिरी, बारवात पाण्याचा टिपका नसल्याने सकाळपासून टँकरची वाट पाहणे हीच महिला वर्गाची ड्युटी बनली आहे. सार्वजनिक विहिरीत टँकरचे पाणी सोडले की एकच झुंबड उडते अन् अर्ध्या तासात विहीर पुन्हा रिकामी केली जाते. काही ठिकाणी गल्लोगल्ली जाऊन प्रतिमाणसी मोजून पाणी दिले जाते.
जनावरांच्या पाण्याचा हिशोब नाही
दररोज प्रतिव्यक्ती २० लिटर याप्रमाणे टँकरने पाणीपुरवठा केला जातो. या हिशोबाने लोकसंख्येच्या प्रमाणात तीन ते चार खेपा केल्या जातात. परंतु यामध्ये जनावरांसाठी पाण्याची तरतूद नसल्याने शेतकºयांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. छावण्या सुरू करण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली असली तरी अद्याप जिल्ह्यात कोठेही छावणी सुरू झालेली नाही.

Web Title: Water supply to 411 tankers in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.